मुख्याध्यापकास दोन हजार रुपयांचा दंड

By Admin | Updated: March 13, 2017 02:24 IST2017-03-13T02:24:07+5:302017-03-13T02:24:07+5:30

माहिती न पुरविल्याच्या पृष्ठभुमीवर राज्य माहिती आयुक्ताने त्यांना दोन हजार रूपये दंड ठोठावला.

Penalty for two thousand rupees to Headmaster | मुख्याध्यापकास दोन हजार रुपयांचा दंड

मुख्याध्यापकास दोन हजार रुपयांचा दंड

जळगाव जामोद, दि. १२- तालुक्यातील भिंगारा येथील जि.प.मराठी उच्च माध्य. शाळेचे मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांनी माहितीच्या अधिकारात नजीम वहीद देशमुख यांना माहिती न पुरविल्याच्या पृष्ठभुमीवर राज्य माहिती आयुक्ताने त्यांना दोन हजार रूपये दंड ठोठावला.
जळगाव जामोद येथील रहिवासी नजीम वहीद देशमुख यांनी जनमाहिती अधिकारी मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांचेकडे जिल्हा परिषद निवासी वसतीगृह भिंगारा येथील मुले व मुलींची पटसंख्या, निवासी वसतीगृह आहे. त्यावर असलेली मालकी, मस्तिक भाडे, भाडे मंजुर केलेल्या पत्राची प्रत, रोज दिल्या जाणार्‍या आहाराचे प्रकार, सदर वस्तु पुरवठय़ासाठी काढण्यात आलेल्या जाहीर निविदा, मुख्याध्यापक ज्या घरात भाड्याने राहतात त्यासंबंधी भाडे अदा केल्याची पावती आदी माहिती मागविली होती. परंतु ही माहिती जनमाहिती अधिकारी मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांनी अर्जामध्ये माहितीचा कालावधी नसल्याने अर्ज खारीज केला होता. त्यामुळे अपीलार्थी यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी जनमाहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक भिंगारा यांना अधिनियम कलम २0 (१) नुसार दोन हजार रूपये एवढा दंड करून सदर दंड पंधरा दिवसाचे आत जमा करण्याचे आदेश दिला. त्यामुळे मुख्याध्यापक माहितीच्या अधिकारात माहिती न देण्यासाठी दंड भरावा लागला आहे.

Web Title: Penalty for two thousand rupees to Headmaster