शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 5:34 PM

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी पालकांच्या हातात शेवटचा एकच दिवस उरला आहे. विविध कागदपत्र वेळेवर न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी पालकांची सध्या धावाधाव होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखिव ठेवण्याची तरतूद आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीतील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ५ मार्चपासून २३ मार्चपर्यंत पलाकांना आॅनलाईन अर्ज करण्याकरीता मुदत देण्यात आली होती. मात्र अर्ज भरण्यास अनेक अडचणी आल्याने काही पालक मुदतीमध्ये अर्ज करू शकले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या  कालावधीत ३० मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला आहे. परंतू आतापर्यंत पालकांना लागणारे विविध कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. निवडणूकांच्या तोंडावर कागदपत्र मिळविणे पालकांसाठी अवघड झालेले आहे. त्यामुळे काही पालकांचे अर्ज भरणे बाकी आहे.  निवडणुकीच्या कामामुळे अडकले आवश्यक कागदपत्रआरटीई अंतर्गत प्रवेशासाठी रहिवासाचा वास्तवाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग अयल्यास तसे प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला यासारखे विविध कागदपत्र आवश्यक आहेत. मात्र हे कागदपत्र मिळविण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने सर्वसामान्यांना लागणारी कागदपत्र ते देण्यासाठी चालढकल करताना दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांचे आवश्यक कागदपत्र केवळ निवडणुकीच्या कामामुळे अडकले आहेत. परिणामी ते आपल्या पाल्याचा अर्जही भरू शकले नाही.संकेतस्थळ ‘हँग’आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने अनेक पालक सध्या अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर आहेत. अर्ज वाढल्याने संबंधीत संकेतस्थळच ‘हँग’ होत आहे. इंटरनेट सेवा अगदी संथगतीने चालत असल्याने एक अर्जासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे काही पालक रात्रीच्या वेळेतही अर्ज भरत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा