शालेय शुल्क भरण्याकडे पालकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 03:41 PM2020-12-11T15:41:44+5:302020-12-11T15:45:51+5:30

शाळा ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत; पण फी भरण्यास पालक तयार नाहीत.

Parents' not keen to submeet school fees | शालेय शुल्क भरण्याकडे पालकांची पाठ

शालेय शुल्क भरण्याकडे पालकांची पाठ

Next
ठळक मुद्देमार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यापासून शाळा बंद आहे. सत्र २०१९-२० या वर्षातील ‘’फी’’ पालकांवर थकीत आहे. ’फी’’ न भरल्यामुळे शिक्षकांचे पगार थकले आहे.

 खामगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने पालकांनी ‘’फी’’ न भरण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा फटका राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांना बसतो असल्याने संस्थाचालक अडचणीत आले आहेत.  
मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यापासून शाळा बंद आहे. त्यामुळे सत्र २०१९-२० या वर्षातील ‘’फी’’ पालकांवर थकीत आहे. शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले, पण या शैक्षणिक वर्षाची फी भरण्याची पालकांची मानसिकता नाही. शासनाने वेळोवेळी ‘’फी’’ बद्दलचे परिपत्रक जारी केले. अनेक शाळा ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे. पण फी भरण्यास पालक तयार नाही. ‘’फी’’ न भरल्यामुळे शिक्षकांचे पगार थकले आहे. भाड्याच्या इमारतीत शाळा चालविणाऱ्या काही संस्थाचालकांनी तर कुलूप लावले आहे. शहरातील काही नामांकित शाळांनी पालकांकडून फी घेतली आहे, पण छोट्या संस्थांच्या शाळांना ‘’’’फी’’’’ वसूल करणे शक्य झाले नाही.  हा प्रादुर्भाव पुढे आणखी काही महिने राहिल्यास आणि पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास अनेक शाळांची अशीच अवस्था होणार असल्याची भीती संस्थाचालकांनी व्यक्त केली. 

आरटीईअंतर्गतचा निधी थकीत 
आरटीईअंतर्गत शाळांना मिळणारा निधी थकीत आहे. त्यामुळेही संस्थाचालक अडचणीत आले आहे. आरटीईअंतर्गत असलेल्या थकीत असलेला निधी शाळांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही संस्थाचालकांनी केली आहे.


शासनाने एक तरी जबाबदारी स्वीकारावी!
खासगी, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित तत्त्वावर चालणाऱ्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने घ्यावी. 

Web Title: Parents' not keen to submeet school fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.