लोणार तालुक्यात नविन चेहऱ्यांना सधी; पिंपळखुटा सरपंचपदी मापारी तर किन्हीच्या सरपंचपदी कायंदे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:34 PM2022-09-19T15:34:58+5:302022-09-19T15:39:18+5:30

यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती...

Opportunity for new faces in Lonar Taluka; Mapari won the Sarpanch post of Pimpalkhuta and Kayande won the Sarpanch post of Kinhi | लोणार तालुक्यात नविन चेहऱ्यांना सधी; पिंपळखुटा सरपंचपदी मापारी तर किन्हीच्या सरपंचपदी कायंदे विजयी

लोणार तालुक्यात नविन चेहऱ्यांना सधी; पिंपळखुटा सरपंचपदी मापारी तर किन्हीच्या सरपंचपदी कायंदे विजयी

googlenewsNext

मयूर गोलेच्छा -

लोणार (बुलढाणा)  : तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास मापारी, तर किन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवप्रसाद कायंदे विजयी झाले आहेत. किन्ही-पिंपळखुटा-मातमळ गट ग्रामपंचायतींपैकी नव्याने निर्माण झालेल्या किन्ही आणि पिंपळखुटा - मातमळ ग्रामपंचायतीसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती.
 
सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यामध्ये किन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवप्रसाद काशीराम कायंदे हे विजयी झाले. कायंदे यांनी ४५३ एवढी मते घेऊन विकास मदनराव इंगोले यांचा १३७ मतांनी पराभव केला, तसेच प्रभाग एकमधून महादेव आनंदा मोरे, शांताबाई वसंता चव्हाण, मंगल अमोल शिंदे, प्रभाग २ मधून कविता विकास इंगोले, अमोल पंजाबराव चव्हाण, प्रभाग ३ मधून कृषिवार्ता श्रावण म्हस्के, पुरुषोत्तम महादू चव्हाण हे सदस्य अविरोध निवडून आले आहे. गट ग्रामपंचायत मधून किन्ही ग्रामपंचायत स्वतंत्र अस्तित्वात आल्या नंतर सरपंच पदासाठी जनतेतून पहिल्यांदाच पार पडलेल्या या निवडणुकीत किन्ही येथील ७ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.

पिंपळखुटा - मातमळ गट ग्राम पंचायतच्या सरपंच पदासह ७ सदस्यांसाठी निवडणुक घेण्यात आली़  सरपंच पदासाठी प्रगतीशील शेतकरी रामदास तुकाराम मापारी यांनी ९३० मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांनी या निवडणुकीत ५७१ मतांची आघाडी घेत आपल्या विरोधकांना पराभूत केले. तसेच प्रभाग १ मधून नामाप्र महिला जागेवर पुष्पा खुशालराव गायकवाड यांनी २२० मते, अमोल दिनकर शिंदे २४५ मते, नंदा गजानन खोडकर २३६ मते, प्रभाग दोन मधून शोभा सोनाजी चव्हाण २९६ मते, पूजा कैलास मापारी ३८० मते, तर प्रभाग तीन मधून सतीश केरुबा मापारी यांनी सर्वाधिक ४४३ मते, घेऊन दणदणीत विजय मिळवला. पिंपळखुटा ग्रामपंचायत मध्ये तीन जागेवर प्रभाग २ मधून आसाराम विश्वनाथ मापारी, तर प्रभाग तीन मधून राजेश भीमराव मापारी, व शारदा माधव काळे हे तीन सदस्य अविरोध निवडून आले आहे.
 

Web Title: Opportunity for new faces in Lonar Taluka; Mapari won the Sarpanch post of Pimpalkhuta and Kayande won the Sarpanch post of Kinhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.