शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

जिगाव प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा!

By admin | Published: December 25, 2016 2:24 AM

प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमीन वळती.

बुलडाणा, दि. २४- जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या जिगाव पाटबंधारे प्रकल्पाकडे वनजमीन उपलब्ध नसल्याने प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबीत होता. वन विभागाने जिगाव पाटबंधारे प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमिन वळती केल्याने जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.सिंचन प्रकल्पासून दुरपर्यंतच्या शेतकर्‍यांच्या शेतीला एक प्रकारची संजीवनीच मिळते. सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर परिसरातील शेतीमध्येही नेहमी हिरवळ राहते. तसेच सिंचन प्रकल्पामुळे उत्पादनात वाढ होऊन त्या शेतकर्‍यांचा विकास साधण्यास मदत होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिगाव सिंचन प्रकल्प सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूरा, शेगाव, खामगाव, मलकापूर, तसेच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, या आठ तालुक्यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प २00८ मध्ये सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ७३७ दलघमी असून, त्यामुळे ८४ हजार २४0 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. या प्रकल्पामुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता २0 टक्क्यांपयर्ंत पोहोचू शकते. एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतांना या प्रकल्पाच्या बांधकामाकरिता प्रकल्पाकडे वनजमीन उपलब्ध नसल्यामुळे मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी कार्यकारी अभियंता मून प्रकल्प खामगाव विभाग यांच्याकडून वन (संवर्धन) अधिनियम, १९८0 अंतर्गत जिगाव मोठा पाटबंधारे प्रकल्पाच्या बांधकामाकरिता १0५५.६५ हेक्टर वनजमिन वळती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. तेंव्हा जिगाव प्रकल्प हा जिल्ह्याच्या फायद्याचा असून त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असल्याने १0५५.६५ हेक्टर वनजमिन वळती करण्याचे आदेश शासनाच्या वन विभागाने १५ डिसेंबर रोजी दिले आहेत. ज्यामध्ये अवर्गीकृत राखीव वनजमिन व संरक्षित वनजमिन समाविष्ट आहे. जिगाव प्रकल्पाला वनजमिन मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रश्न सुटणार आहे. प्रकल्प यंत्रणेवर राहणार मुख्य वनसंरक्षकांची नजरजिगाव प्रकल्पासाठी १0५५.६४ हेक्टर वनजमिन वळती केल्यानंतर त्यासाठी प्रकल्प यंत्रणेला विविध अटींचे अनुपाल करावे लागणार आहे. यादरम्यान प्रकल्प यंत्रणेवर अमरावतीचे मुख्य वनसंरक्ष प्रा.यांची नजर राहणार आहे. यासंदर्भात अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक हे प्रकल्प यंत्रणेची वेळोवेळी चौकशी करून तसा अहवाल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना सादर करतील. तसेच यामध्ये वन संवर्धन अधिनियम, १९८0 व त्याअंतर्गत केलेल्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीतांवर कार्यवाही सुद्धा होऊ शकते.