शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

By admin | Updated: January 14, 2015 23:52 IST

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारांवर धार्मिक स्थळे अतिक्रमीत जागेवर; अवैध धार्मिक स्थळ पाडण्याचे उच्च न्यायालयाचे निेर्देश.

बुलडाणा : जिल्हाभरात रस्त्यांच्या कडेला तसेच अतिक्रमित जागांवर तब्बल एक हजार १६४ विविध धर्मांची व पंथांची मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे आहेत. यातील नियमित व अनियमित स्थळांची यादी तयार करण्यात आली असून, २७ स्थळांना स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता असे अतिक्रमित धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई हाती घेतली जाणार आहे. अवैध धार्मिक स्थळे पाडण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वा पदपथावर मंदिरे, मशिदी व बुद्धविहार तसेच विविध धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत, यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अशी स्थळे प्रामुख्याने हटविण्यात येणार आहेत. न्यायालयाने दोन वर्षांंपूर्वी अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ११६४ धार्मिक स्थळे सरकारी जागांवर तसेच रस्त्यांच्या कडेला असल्याचे आढळून आलीे होती. शहरी भागात १ हजार १४ तर ग्रामीण भागात १५0 धार्मिक स्थळांचे अवैध निर्माण कार्य झालेले आहे. ज्या जागांवर असे धार्मिक स्थळे उभारली आहेत त्या जागा ज्या विभागांच्या आहेत त्यांनी असे अवैध निर्माण कार्य करणार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यावर १५ दिवसात स्पष्टीकरण मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली होती; मात्र अजूनही असे अनधिकृत धार्मिक स्थळे कायमच आहेत. बुलडाण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची २३ जुलै २0१४ रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या शिफारसीनुसार एक हजार १६४ धार्मिक स्थळे असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आता राज्यशासनाकडून निर्देश प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार आर एन देवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयानुसार शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी निर्देश प्राप्त होताच प्रशासन कार्यवाही सुरू करेल, असे त्यांनी सांगीतले.