खासगी बस-ट्रकच्या धडकेत एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:45 IST2018-12-04T16:45:14+5:302018-12-04T16:45:22+5:30
कारंजा लाड (वाशिम) : खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.

खासगी बस-ट्रकच्या धडकेत एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार एम. एच. २९ टी ०७३६ क्रमांकाचा ट्रक शेलुबाजारकडून कारंजाकडे येत असतांना विरूध्द दिशेने येणाºया एम. एच.४० ए.टी.९३५ या सैनी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ट्रकचालक विलास सवाई चव्हाण (३६) रा. वाइलिंगी ता. दिग्रस जि. यवतमाळ हे जागीच ठार झाले. तर राजेश अलधरे (४०) रा. नागपूर, राहूल रमेश देवलकार (२२) रा. छिंदवाडा (मध्यप्रदेश), दिपक साहो (२६) रा. नागपूर व शिशिर वसंत कुळकर्णी (३०) रा जुने शहर अकोला हे जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलल्या जाते. या अपघातानंतर खासगी ट्रव्हल्सचे दार बंद झाल्याने प्रवाशांच्या मनात भिती निर्माण झाली होती. अखेर प्रवाशी खिडकीचे काच फोडून बाहेर पडले. जखमींना दिपक वाघमारे, सुमीत बागडे व बंडु चतुरकार यांनी रूग्णवाहिकेने उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.