शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस-दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: January 1, 2017 01:37 IST

औरंगाबादवरुन येणा-या एसटीने दिली धडक.

धाड(जि. बुलडाणा), दि. ३१- जवळच असलेल्या ग्राम म्हसलानजीक एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात दुचाकीवरील एक युवक ठार झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३0 वाजता घडली. धाड पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या ग्राम म्हसलाजवळ असलेल्या एका वळणावर औरंगाबादवरून येणारी एम.एच.१४ बीटी ४३0६ या क्रमांकाची औरंगाबाद-जळगाव जामोद बस आणि एम.एच.२0 बी.एल. २२१४ या क्रमांकाची दुचाकीची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक अमोल सदाशिव आराख (वय २८) हे जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील कावेरी सदाशीव आराख आणि सुलोचना काकडे सर्व रा. मिलिंदनगर, बुलडाणा गंभीररीत्या जखमी झाले आहे. घटना घडल्यानंतर नागरिकांनी १0८ रुग्णवाहिकेतून जखमींना बुलडाणा येथे उपचारार्थ रवाना केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बसचालकासह बस ताब्यात घेऊन एसटी चालक अरुण अंबादास माल्टे यांना अटक केली आहे. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.