दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

By सदानंद सिरसाट | Updated: May 6, 2024 21:32 IST2024-05-06T21:30:49+5:302024-05-06T21:32:09+5:30

नांदुरा (बुलढाणा) : प्रवासी गाडी व दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वार एक ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना नांदुरा शहराजवळच ...

One killed, one injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

मृत - प्रदीप प्रकाश बोदडे

नांदुरा (बुलढाणा) : प्रवासी गाडी व दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वार एक ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना नांदुरा शहराजवळच शिवशंकर नगरसमोर जळगाव जामोद रोडवर रविवारी रात्री घडली.

रविवारी रात्री १ वाजता दरम्यान प्रदीप प्रकाश बोदडे व राजेंद्र पंढरी चरखे हे दोन मित्र दुचाकीने नांदुराकडे येत होते. त्याच दरम्यान नांदुऱ्याकडून जळगाव जामोदकडे जाणारे प्रवासी वाहन व दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात नांदुरा शहरातील वाॅर्ड क्रमांक पाच सिनेमा रोड येथील प्रदीप प्रकाश बोदडे (३२) हा युवक ठार झाला. तर, त्याचा मित्र राजेंद्र पंढरी चरखे (रा. निमगाव) हे जखमी झाले. त्यांना पुढील उपचाराकरिता खामगाव येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. याबाबत मृतकाचा भाऊ संदीप प्रकाश बोदडे यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी वाहन क्रमांक एमएच-२९, बीसी-८७८५ चा चालक धनराज नागोराव कोकरे रा. सुकळी, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली. मृतक प्रदीप प्रकाश बोदडे यांच्यावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: One killed, one injured in two-wheeler accident