शेलापूरनजीक मोटारसायकल अपघात दाताळ्यातील एक ठार; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:46 AM2020-05-26T10:46:16+5:302020-05-26T10:46:40+5:30

दाताळ्यातील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

One killed in motorcycle accident near Shelapur; One serious | शेलापूरनजीक मोटारसायकल अपघात दाताळ्यातील एक ठार; एक जण गंभीर

शेलापूरनजीक मोटारसायकल अपघात दाताळ्यातील एक ठार; एक जण गंभीर

Next

मलकापूरः शेलापूर येथील जुन्या बसस्थानक जवळ मोटारसायकल अपघातात तालुक्यातील दाताळ्यातील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील मौजे दाताळा येथील प्रकाश नारायण चौधरी वय ५६ व संजय गोविंदा चौधरी वय ५२ असे दोघे हिरोहोंडा मोटारसायकलीने घराकडे परतीच्या वाटेवर होते. मलकापूर बुलढाणा रस्त्यावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उशिरा रात्री मलकापूर येथील कोलते हाँस्पिटलात दाखल करण्यात आले. दोघापैकी संजय चौधरी यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या.मात्र प्रकाश चौधरी ह्यांना डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमा झाल्याने डाँ.गौरव कोलते यांनी त्यांच्यावर शर्थीचे उपचार केले.
मात्र प्रकाश चौधरी यांची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना उशिरा रात्री जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.या घटनेची वार्ता पसरताच दाताळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
( तालुका प्रतिनीधी)

Web Title: One killed in motorcycle accident near Shelapur; One serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.