धुऱ्याच्या वादातून एकाची हत्या; तरोडानाथ येथील घटना

By अनिल गवई | Updated: September 27, 2022 15:04 IST2022-09-27T15:03:42+5:302022-09-27T15:04:24+5:30

खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये शेतात असताना धुऱ्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.

One killed in a smoke dispute; Incident at Tarodanath | धुऱ्याच्या वादातून एकाची हत्या; तरोडानाथ येथील घटना

धुऱ्याच्या वादातून एकाची हत्या; तरोडानाथ येथील घटना


खामगाव - धुऱ्याच्या वादातून एकाने शेजाऱ्याची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी खामगाव तालुक्यातील तरोडा नाथ येथे घडली. रघुवीर हरदास घोती (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला पिंपळगाव राजा पोलीसांनी अटक केली आहे.

 खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये शेतात असताना धुऱ्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यानंतर  देवराम काशिराम वाघमोडे याने रघुवीर घोती यांच्या छातीत विट फेकून मारली. वाघमोडे याने केलेला प्रहार एवढा घातक होता की रघुवीर घोती हा वृध्द इसम जागीच कोसळून ठार झाला. 

घटनेनंतर आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
 

Web Title: One killed in a smoke dispute; Incident at Tarodanath