कारच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूध्द दिशेने जाणाºया भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक ...

कारच्या धडकेत एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूध्द दिशेने जाणाºया भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आरमोरी जवळील साईराम पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
सदाशिव उईके (४५) असे मृत इसमाचे नाव आहे, तर देवाजी कुमरे व प्रकाश कुमरे (३०) हे जखमी झाले आहेत. हे तिघेही डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रकाश कुमरे यांच्यासाठी मुलगी बघण्यासाठी आरमोरी येथे एकाच दुचाकीने हे तिघे जण येत होते. दरम्यान गडचिरोली मार्गावरील पेट्रोलपंपासमोर गडचिरोलीकडे जाणाºया एमएच ०४ ईएक्स २९७१ क्रमांकाच्या कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. दुसऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात सदर अपघात झाला.
या अपघातात सदाशिव उईके हे रूग्णालयात नेताना मरण पावले. देवाजी कुमरे व प्रकाश कुमरे हे गंभीर जखमी झाले आहेत. पेट्रोल पंपाच्या अगदी समोर अपघात घडला. या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज बघून अपघात नेमका कसा घडला, याची माहिती पोलीस घेत आहेत.
अधिक तपास ठाणेदार दिगांबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक धोंडसे करीत आहेत.