माथनीमध्ये स्फोटकाच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:09 IST2019-04-27T15:41:55+5:302019-04-27T16:09:21+5:30

माथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

one dead and one injured in khamgaon mathani blast | माथनीमध्ये स्फोटकाच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू

माथनीमध्ये स्फोटकाच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू

ठळक मुद्देमाथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.स्फोट झालेल्या ठिकाणी असलेल्या प्रचंड धुरामुळे पोलीस आणि प्रशासनाला मदतकार्य करण्यास अडथळे येत आहेत.

खामगाव - तालुक्यात माथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. स्फोट झालेल्या ठिकाणी असलेल्या प्रचंड धुरामुळे पोलीस आणि प्रशासनाला मदतकार्य करण्यास अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. 

खामगाव शहरापासून जवळच असलेल्या माथनी शिवारात स्फोटकाचे गोदाम आहे. वाढत्या तापमानाने या गोदामात शनिवारी दुपारी अचानक स्फोट झाला. यात गोपाळ मिसाळ नावाच्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौधरी नावाचा एक कामगार जखमी झाला आहे. जखमी असलेल्या कामगाराला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर या घटनेत आणखी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी काही वेळ प्रचंड धुराचे लोट निघत असल्याने पोलिसांनी याठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. 

 

Web Title: one dead and one injured in khamgaon mathani blast