शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

आता विधानसभेसाठी इच्छुकांचा काथ्याकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 3:31 PM

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीची उत्तरार्धाची कहानी निकालानंतर सफळ संपूर्ण झाली असली तरी आता १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी काथ्याकुट सुरू झाली आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: लोकसभा निवडणुकीची उत्तरार्धाची कहानी निकालानंतर सफळ संपूर्ण झाली असली तरी आता १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी काथ्याकुट सुरू झाली आहे. अवघ्या तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक आली असताना विधानसभा निहाय मिळणार्या मताधिक्याच्या आधारावर सातही विधानसभा मतदार संघात सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांमधूनही या निकालाचा अन्वयार्थ काढण्याचे प्रयत्न आहेत.बाराव्या विधानसभा निवडणुकीमध्ये (२००९) सातही विधानसभा मतदार संघातून ८५ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले होते तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले होते. यंदाही हा आकडा १०० आसपास जाण्याची शक्यता आहे. आता १४ व्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून सातही विधानसभा मतदार संघातून इच्छूक असलेल्यांकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षनिहाय मिळालेली मते पाहून आपल्या राजकीय व्युव्हरचना आखण्याच्या दृष्टीने कागदावर आकडेमोड सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इच्छुकांनी आपल्या मतदार संघात कोणते पॉकेट प्रबळ व मताधिक्य देणारे ठरेल याचा अंदाज आधीच बांधलेला आहे. सातही विधानसभेतील विद्यमान आमदार गत वेळचे पराभूत उमेदवार यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान विधानसभेचे गणितही समोर ठेवले होते. निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीचे इच्छूक कामाला लागले आहेत.वर्तमान स्थितीत जिल्ह्यात युतीची ताकद अधिक आहे. भाजप तीन आणि सेना दोन असे पाच आमदार युतीकडे आहेत. त्या तुलनेत काँग्रेसकडे दोन आमदार आहेत. त्यामुळे ताकद तुलनेने कमी आहे. २००९ मध्ये बसपा फॅक्टर फारसा चालला नव्हता. २०१४ मध्ये मनसे फॅक्टरने शिवसेनेला बुलडाण्यात फटका दिला होता. यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन फॅक्टर कोणती सत्ता समिकरणे बिघडवतो हे बघण्यास अद्याप अवकाश आहे.(प्रतिनिधी)

मागील निवडणुकाही चर्चेतयापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही शब्द हे चांगलेच प्रचलित झाले होते. राजकीय वाद, सत्तासंघर्ष त्यास कारणीभूत होता. त्यातूनच बुलडाण्यात ‘दगडा पेक्षा विट मऊ’, ‘भला माणूस’, ‘पराभवसाठी कधी निवडणूक लढवली नाही’, चिखलीत ‘भाऊबंदकीचा वाद उफळा’, सिंदखेड राजात ‘अ‍ॅन्टी इनकंबन्सी’, मेहकरमध्ये ‘जागा वाटपातील सुंदोपसुंदी’ हे शब्द प्रसारमाध्यमांसह जनसामान्यांच्या तोंडीही होते. यंदा आता कोणते शब्द येतात हे बघण्यासारखे राहील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारण