शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 4:27 PM

सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्दे रोहींचे मृतदेह कुजल्यानंतरही वनविभागाने ते बाहेर काढण्याची तसदी घेतली नाही.वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी येथे येऊन पंचनामाचे सोपस्कार पार पाडले आहेत.पंचनामा केल्यानंतर वनविभागाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महेंद्र मोरेसोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आठ ते दहा दिवसांपासून विहिरीत पडून असलेले रोहींचे मृतदेह कुजल्यानंतरही वनविभागाने ते बाहेर काढण्याची तसदी घेतली नाही. ३१ मे रोजी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी येथे येऊन पंचनामा करण्याचे केवळ सोपस्कार पार पाडले आहेत.सोनोशी बिट अंतर्गत तांदुळवाडी शिवारामध्ये सुखदेव उत्तम डिघोळे यांच्या गट क्रमांक ५९ मधील शेतातील विहीरीत हे नऊ रोही पडल्याचे समोर आले आहे. नऊ ते दहा दिवसापूर्वी हे प्राणी विहीरीत पडले असावेत. त्यांनंतर पाच ते सात दिवसांनी वनविभागाला याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पण त्यांनी पंचनाम्याशिवाय दुसरा कुठलाही सोपस्कार केला नाही. तांदुळवाडी शिवारातील जमिनीला समांतर असलेल्या या जंगला नजीकच्या विहीरीत हे नऊ रोही पडले होते. आता हे रोही कुजलेल्या स्थिती आहेत. वनविभागाने ३१ मे रोजी येथे पोहोचत पंचनामा केला. मात्र या वन्यप्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात वनविभाग अयशस्वी झाला आहे. पंचनामा केल्यानंतर वनविभागाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विहीरीत पडून नऊ रोहींचा मृत्यू झाल्यानंतरही वनविभाग मात्र झोपलेल्या अवस्थेत होता. वेळीच याची माहिती वनविभागाने घेतली असती तर हे वन्यजीव वाचू शकले असते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न न करता केवळ पंचनाम्याचा सोपस्कार आटोपण्याचे काम वनविभाग करत आहे. त्यामुळे वनविभागाचे ठिसाळ नियोजन अधोरेखीत होत आहे. प्रादेशिक विभागातंर्गतच्या या जंगलामध्ये खरेच वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतील का? हा संशोधनाचा प्रश्न आहे. बरे गस्त घालत असतील तर या रोहींची माहिती वेळेत वनविभागाला का मिळाली नाही, यावरही मंथन होण्याची गरज आहे.पिंपरखेड जंगलात एकमेव पानवठाएकीकडे दुष्काळी स्थितीचा जिल्हा सामना करत असताना जंगलामध्येहे पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती होत आहे. जंगलातच पाणी उपलब्ध नसल्याने नागरी भागाकडे वन्यप्राणी येऊ लागले आहेत. सोनोशीसह लगतच्या परिसरातील सहा जंगलांमिळून केवळ पिंपरखेड येथील जंगलातच एकमेव पाणवठा आहे. इतरत्र पानवठा नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. जंगलातील पानवठ्यासाठी वनविभागाकडून आर्थिक तरतूद केली जाते. मात्र प्रत्यक्षा किती पानवठे प्रादेशिक वनविभागाने या भागात केले आणि त्यात नियमितपणे पाणी सोडले हा कळीचा मुद्दा आहे.पाच दिवसानंतर माहिती मिळाली- दुबेविहीरीत पडून नऊ रोही मृत्यूमुखी पडल्याची माहिती वनविभागार्पंत तब्बल पाच दिवस उशिराने पोहोचली. त्याठिकाणी जावून आम्ही पंचनामा केला. सोबतच हुक टाकून रोहींचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुजलेल्या अवस्थेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. आता विहीरीतील पाणी काढून नऊ रोहींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार असल्याचे सोनोशी बिटचा अलिकडील काळात प्रभार सांभाळणारे तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी एस. एच. दुबे यांनी  लोकमत शी बोलताना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई