शेजाऱ्यांनी साडेसहा हजार रुपयांच्या बांधकाम साहित्याची चोरी केली; महिलेची पोलिसांत तक्रार
By अनिल गवई | Updated: September 28, 2022 13:11 IST2022-09-28T13:10:37+5:302022-09-28T13:11:25+5:30
श्यामल नगरातील भारती नामदेव गवई (३८) यांच्या घराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी भारती गवई यांनी बांधाकाम साहित्य आणले होते.

शेजाऱ्यांनी साडेसहा हजार रुपयांच्या बांधकाम साहित्याची चोरी केली; महिलेची पोलिसांत तक्रार
खामगाव : अंगणात ठेवलेले बांधकाम साहित्य शेजाऱ्यांनीच चोरून नेण्याची घटना स्थानिक श्यामल नगरात उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने दोन शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्यामल नगरातील भारती नामदेव गवई (३८) यांच्या घराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी भारती गवई यांनी बांधाकाम साहित्य आणले. दरम्यान, २३ ते २४ सप्टेंबरच्या कालावधीत त्यांचे शेजारी कल्पना चव्हाण (४२, रा. श्यामल नगर) आणि सोपान पाटील (४५, साई नगर) यांनी स्वत:च्या फायद्यासाठी चोरून नेल्याची तक्रार गवई यांनी शहर पोलीसात दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी उपरोक्त आरोपीविंरूध्द भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.