इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:48 IST2018-09-05T13:47:23+5:302018-09-05T13:48:34+5:30

मलकापूरात पदाधिकारी व कार्यकर्यांनी भररस्त्यावर पायी मोटारसायकली चालवून आगळे वेगळे आंदोलन केले.

Nationalist Congress aggressor to protest against fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनास हनुमान चौकातून सुरुवात झाली. पदाधिकारी व कार्यकर्ते बुलढाणा रस्त्यावरून तहसील कार्यालयात धडकले.

मलकापूर ः पेट्रोल व दरवाढ नागरिकांना वेठीस धरत आहे.त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेतला.मलकापूरात पदाधिकारी व कार्यकर्यांनी भररस्त्यावर पायी मोटारसायकली चालवून आगळे वेगळे आंदोलन केले.
आज बुधवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनास हनुमान चौकातून सुरुवात झाली. पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे,सरकार चा निषेध असो निषेध असो,राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा घोषणा अशा घोषणा देत पायी मोटार सायकल चालवत पदाधिकारी व कार्यकर्ते बुलढाणा रस्त्यावरून तहसील कार्यालयात धडकले.
त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे, तालुका अध्यक्ष माधवराव गायकवाड,शहर अध्यक्ष शाहीद शेख,पं स सदस्य सुरेश पाटील, बबनराव तायडे,सरपंच संघटना अध्यक्ष बाळासाहेब पाटील, खविस अध्यक्ष अरूण पाटील,डॉ अशोक सुरडकर, शुभम लाहुडकर,विलास घुले,रामेश्वर पवार,आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते.(तालुका प्रतिनीधी)

Web Title: Nationalist Congress aggressor to protest against fuel price hike