शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नमामी गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती  होणार : माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:21 IST

बुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविस्तारीत कार्यकारीणीची झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा : नदी, नाले ओढ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच भविष्यातील नदीजोड प्रकल्प अभियान गावपातळीवर राबविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, राज्यात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. नमामि गंगे अभियानातून जिल्हाभरात जलक्रांती निर्माण होणार असून आपल्या भागातील नदी प्रकल्पाची माहिती तातडीने कळवावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री तसेच नमामि गंगे अभियानाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ माळी यांनी पाच नोव्हेंबर रोजी विश्रमागृहावर आयोजित विस्तारीत कार्यकारीणी बैठकीत केले.या बैठकीला नामामि गंगेचे पश्चिम विदर्भ सह सदस्य शाम देवडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात, अरविंद शिंदे, दत्ता पाटील, तसेच जिल्हाभरातील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विश्वनाथ माळी म्हणाले, नामामि गंगे अभियान गाव पातळीवर नदी नाले स्वच्छ करून शेती व शेतकºयांसाठी सिंचन सुविधा तसेच दुष्काळग्रस्त भागात पेयजल संकट दूर करण्यासाठी भविष्यात नदीजोड  प्रकल्प ही लोकचळवळ करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासोबतच सिंंचन क्षमता वाढविण्यासाठी  या योजनेवर निधी उपलब्ध करून दिला आहे. नदीचे व धरणांचे रुंदीकरण, तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तापी ते बुद्धनेश्वर, पाताळगंगा ते नळगंगा, मेहकर तालुक्यातील महत्वाकांक्षी  प्रकल्प तसेच सिंंदखेड राजा तालुक्यातील आमना धामना नदी प्रकल्पासह प्रकल्प केंद्रीय जलसंपदा विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.राज्यातील नदीजोड प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्टÑसाठी नदीजोड  प्रकल्पातंर्गत २४ हजार कोटी  रूपयांची तरतुद केली असल्याचे सांगून नमामि गंगेत बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकास्थानी गावपातळीवर सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगर सेवक यांना या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून जलक्रांती निर्माण करावयाची असल्याने सर्वांनी एकत्र येण्ची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहूणे म्हणून नमामि गंगेचे पश्चिम विदर्भ सहसदस्य शाम देवडे पाटील यांनी नमामि गंगे या अभियानाचे महत्त्व गाव पातळीवर कार्यकर्त्याच्या  मार्फत सांगून लोकचळवळ उभी करण्यासाठी प्रत्येक गावात नमामि गंगेची शाखा गठीत करावी. तसेच प्रत्येक गावात कार्यकारिणीचे फलक लावावे. आपल्या भागातील नद्यांची माहिती संकलीत करून या अभियानात जलसंकटावर मात करण्यासाठी सहभागी व्हावे, तसेच या अभियानाची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना त्यांनी दिली.जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव खरात यांनी नमामि गंगेची सविस्तर विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविकात दत्ता पाटील यांनी जिल्हाभरातील  तापीनदीचे पाणी सवडद बारा पर्यत आणून बुधनेश्वर येथे पैनगंगेच्या उगमात सोडण्याचा प्रकल्प तसेच पलढग धरणातील पाणी पाताळगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प या संदर्भात माहिती दिली. विस्तारीत बैठकीला नमामि गंगेचे जिल्हा सरचिटणीस अनंत खेकाळे, अर्जूनराव वानखेडे, सखाराम नरोटे, साहेबराव गवते, अ‍ॅड. दशरथसिंह राजपूत, प्रकाश पडोळ, गणेश जवरे, मंगेश सातव, किशोर गवळी, अशोक राजपूत, कृष्णा लकडे, महादेवराव देशमुख, राजेंद्र बोचरे, किशोर जामदार, विकास वानेरे, सुनील शेवाळे, प्रकाश म्हस्के, केशव बाहेकर, विजय मापारी, गणेश तंगडे, गोपाल राजपूत, अमोल बारवाल, राजेश वानखेडे, समाधान वाघ, ओम भुसारे, गोंविद चव्हाण, कुमोदिनी कोलते, सुनीता तिडके, समीर भालेराव, नितीन दासार, रवी पाखरे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष गिरीष किन्हीकर यांनी मानले.

टॅग्स :riverनदीWaterपाणीBJPभाजपा