Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:45 PM2021-10-31T19:45:01+5:302021-10-31T19:46:24+5:30

नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली असून, नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावे, असे म्हटले आहे. 

narayan rane criticized who is nawab malik they should look at their background then speak | Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

Next

बुलडाणा:मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, आर्यन खानला अटक करण्यात आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि या तपास यंत्रणेवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोप आणि टीकेला समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) प्रत्युत्तर देत असून, भाजपही नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. यातच केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली असून, नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावे, असे म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुलडाणा येथे मीडियाशी संवाद साधला. दि. चिखली अर्बन को ऑप बँक लि.च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नि:शुल्क उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी नारायण राणे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांना समीर वानखेडे यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मी आता जाईन आणि मोदी साहेबांना विचारेन की आपण पाठीमागे आहोत का, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी

नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहे? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी आणि मग दुसऱ्यांवर बोलावे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलेत की, चेंबूर येथील एक व्यक्ती फडणवीस यांच्या जवळचा आहे आणि ईडीच्या सतत संपर्कात समीर वानखेडे असतात, असे माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यावर नारायण राणे यांनी सांगितले की, मग काय त्यात काय झाले? कोण कोणाचा मित्र आहे, माझाही आहे तो, मित्र नाही तर तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा आहे, मुळात माझे लहानपण, आयुष्य  चेंबूरमध्ये गेले आणि तो काही दहशतवादी नाही आणि तो संपर्कात असतो ईडीची ओळख आहे, चांगली माहिती देतो, दोन नंबरच्या लोकांची. पैसे लपून ठेवतात ना त्या लोकांची. भुजबळांना अटक का झाली, पंढरपूरला तीर्थ यात्रेला गेले म्हणून झाली का? ते आता फार बोलत आहेत, असा पलटवार नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. 
 

Web Title: narayan rane criticized who is nawab malik they should look at their background then speak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.