शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाची छुपी विक्री

By admin | Updated: January 14, 2015 00:51 IST

न्यायालयाची बंदी धाब्यावर : यंत्रणेचे दुर्लक्ष लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून उजागर.

बुलडाणा : राज्यात नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला असला तरी जिल्ह्यात चोरीछुपे नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमत चमूने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आले. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवित विक्रेते संबंधित शासन यंत्रणेला हा ताशी धरुन आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या नायलॉन मांजामुळे होणारे अपघात ही दरवर्षीची समस्या आहे. विशेषत्वाने पादचारी आणि दुचाकी वाहनधारक तसेच पक्षी नायलॉन मांजाचे बळी ठरत आहेत. पतंगासाठी नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी जिल्ह्यात नायलॉन मांजाची छुपी विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. पतंगाचा मांजा मजबूत असावा, काटाकाटीच्या खेळात तो तुटू नये यासाठी शहरातील अनेक पतंगप्रेमी नायलॉन मांजाला जास्त पसंती देतात. या मांजास अधिक मागणी असल्याने विक्रेत्यांकडूनही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. शहरात स्थायी स्वरूपाचे दुकान नाही; मात्र संक्रांतीच्या सणानिमित्त शहरातील जनता चौक, इकबाली चौक, कारंजा चौकात पतंग व मांजा विक्रीची दुकाने थाटली गेली असून नायलॉन मांजाला ग्राहकांची मोठी पसंती आहे. मात्र हा मांजा विकताना दुकानदार कमालीची गुप्तता पळाताना दिसतात. नायलॉन मांजा खरेदी-विक्री करताना ग्राहक व दुकानदार तंबूज या कोड वर्डचा वापर करतात. असा आहे न्यायालयाचा आदेशमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास तूर्तास नकार देऊन व्यापार्‍यांना ह्यवेट अँन्ड वॉचह्ण भूमिकेवर ठेवले. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री व वापर सुरू ठेवायचा की, कायमची बंदी आणायची यावर शासनाला १९ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घेण्याचे निर्देश देऊन मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी गेल्या १0 वर्षांपासून ठोस निर्णय घेतला नाही म्हणून न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केली आहे.*मनुष्य व पक्ष्यांसाठी घातकनायलॉन मांजामुळे मनुष्य आणि पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. हा मांजा तुटत नाही. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या लोकांच्या मानेत, पायात अडकून गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. नायलॉन मांजा एखाद्या झाडावर किंवा विद्युत वायरवर अडकल्यास त्याचा पक्ष्यांना कायमचा धोका असतो. *गुजरातमधून येतो मांजागुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातून पतंग आणि नायलॉन व साधा-पारंपरिक मांजा बुलडाणा शहरातील बाजारपेठेत आला आहे. याशिवाय गोटा, स्टिल, गावठी, चकमक नाव असलेला मांजाही बाजारपेठेत उपलब्ध आहे. हा मांजा ५0 ग्रॅम, २५0 ग्रॅम, ५00 ग्रॅम अशा पद्धतीने ग्राहकांना विक्री केला जातो. दुकानदाराकडून पेपरमध्ये गुंडळून सुटा मांजा दिला जातो. *खामगावात येतो नागपूरचा मांजाखामगाव शहरातील पतंग विक्रीच्या दुकानावर नायलॉन मांजाची खुलेआमपणे विक्री सुरू असल्याची बाब मंगळवारी निदर्शनास आली. येथे विक्रीसाठी येणारा नायलॉन मांजा हा नागपूरमधून येत असून केवळ मकरसंक्रांतीपुरताच नव्हे तर वर्षभर नायलॉन मांजाची विक्री होते. पतंगाची खरी बाजारपेठ टिळक मैदान भागात असते. या ठिकाणी पतंगासोबतच विविध रंगातील नायलॉन मांजाची विक्री खुलेआमपणे होत आहे. शहरात नायलॉन मांजा हा नागपूर येथून विक्रीसाठी येत आहे. या मांजाचे दर १ हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. किलोच्या बंडलमधून ग्राहकांना मागणीप्रमाणे लागेल तेवढा मांजा रीलवर भरून देण्यात येतो. *बुलडाणा शहरात मांजा विक्रेत्यांची साखळी सक्रियपरराज्यातून नायलॉन मांजा बुलडाणा शहरापर्यंत पोहचविण्यासाठी साखळी सक्रिय आहे. नायलॉन मांजा प्लास्टिक रीळ वा बंडल स्वरूपात कागदी खोक्यातून रेल्वेद्वारे मलकापूर, नांदुरा व शेगावपर्यंत आणला जातो. बर्‍याच वेळा औरंगाबादमार्गे बसेसमधूनही नायलॉनचा मांजा शहरातील बाजारात येतो. पॉलिप्रॉपिलीनपासून तयार करण्यात आलेल्या मांजामुळे पतंग उडविणार्‍यांनाही धोका निर्माण होऊ शक तो. हा दोरा विजेच्या तारेला लागल्यास पतंग उडविणार्‍याला शॉक बसण्याचा धोका असतो.