शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत एकता पॅनल विजयी

By admin | Updated: July 6, 2015 23:52 IST

नांदुरा नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक; परिवर्तन पॅनलचा धुव्वा.

नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक ५ जुलै रोजी पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत एकता पॅनलने सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. ७३ मतदार संख्या असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत ५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ११ पैकी २ जागा अविरोध निवडून आल्याने नऊ जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली. मतमोजणीमध्ये एकता पॅनलचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. यामध्ये आसिफखां छोटेखां, सुनील वाकोडे, दादाराव वाकोडे, अशोक देशमुख, मुरलीधर काटले, राजेश मडके, नितीन खंडारे, आशा सोनवाल व पंचफुला मानकर यांचा समावेश आहे. यापूर्वी याच पॅनलचे हनिफ कुरेशी व पार्वताबाई मोरे हे दोन उमेदवार अविरोध निवडून आले होते. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वात एकता पॅनेलने निवडणूक लढविली. या निवडणुकीत गणेश सारवान व संजय गोहर यांच्या परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते; मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर. ऑफिसचे चवरे यांनी काम पाहिले.