शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पालिकांनी थकविले मजीप्राचे १३४ कोटी

By admin | Updated: February 7, 2015 02:27 IST

पाणीपुरवठा योजनांचा निधी थकल्याने विलंब आकारात वाढ.

बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालिकांना पाणीपुरवठा योजना तयार करून हस्तांतरीत केल्यावर पालिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला एक छदामही दिलेला नाही. पाच पालिका वगळता ६ नगरपालिकांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तब्बल १३४ कोटी ८९ लाख ८३ हजार ६२७ रुपये थकविले असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात आज ६ फेब्रुवारी रोजी माहिती घेतली असता थकबाकी वसुलीसाठी मजिप्रा कठोर निर्णय घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नगरपालिकांच्या विविध योजनांचा आराखडा तयार करून या योजना कार्यान्वित केल्या व पालिकांना हस्तांतरीतही केल्यात. या योजनांसाठी शासन तसेच हुडकोकडून पालिकांना देण्यात आलेले कर्ज, योजनांच्या विम्याची रक्कम, लोकवर्गणी यांची वसुली करण्याचीही जबाबदारी मजिप्राकडे देण्यात आलेली आहे. जीवन प्राधिकरण विभागाने आपली जबाबदारी पार पाडल्यावर पालिकांकडून थकबाकीची रक्कम वसुलीसाठी तगादा लावल्यावरही पालिकांनी एक छदामही मजि प्राला दिलेला नाही, त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून मोठी रक्कम थकित राहिली आहे. या थकित रकमेचे आकडे हे कोटीच्या घरात असल्याने या रकमेचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न आता पालिकांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान थकित रकमेच्या वसुलीसाठी पालिकांना प्रत्येक महिन्याला स्मरणपत्र पाठविले जाते; मात्र वसुली होत नसल्याने मूळ रकमेवरील विलंब आकार वाढला आहे. यासंदर्भात आता पालिकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस मजिप्राकडून शासनाला केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. सरकटे यांनी सांगीतले.