शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या शापातून आणखी ८१ गावे मुक्त होणार

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

जलसंधारणाच्या कामांचे नियोजन; राज्य शासनाकडे २४ कोटींची मागणी.

बुलडाणा : पाणीटंचाईग्रस्त अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ८१ गावात जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे २४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जलसंधारण कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील एकूण जलसंधारणाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. जलसंधारणातून टँकरमुक्तीच्या या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आता लवकरच उर्वरित ८१ गावे टँकरच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात राबविलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे साठवण क्षमता वाढली. त्याचा लाभ घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला. ज्या १८१ गावांना टँकरचा विळखा बसला होता त्या गावांपैकी पहिल्या टप्प्यात १२१ गावांची निवड करून गावाला पाणीपुरवठा करणार्‍या जलस्त्रोताजवळ सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारे व गाव तलावांचे काम पुर्णत्वास नेले, त्यामुळे टँकरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने घटली आहे. यासंदर्भात ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सादरीकरण केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आवर्जून दखल घेतली. १८१ गावांपैकी १00 गावे टँकरमुक्त झाली असून, उरलेल्या ८१ गावांसाठी जलयुक्त शिवार योजनेसोबतच जलसंधारणाच्याही कामाचे नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यावर उरलेल्या ८0 गावांसाठीही निधी विविध योजनेतून निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तत्काळ ८१ गावांसाठी विविध कामांचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी २४ कोटीचा खर्च अपेक्षित आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.प्रवीण कथने आदी उपस्थित होते.