शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी ‘आधुनिक मेघ मल्हार’

By admin | Updated: July 22, 2015 23:44 IST

अनुराधा अभियांत्रिकीचा उपक्रम; पाणी व इंधन बचतीचा दिला संदेश.

चिखली (जि. बुलडाणा): जून महिना कोरडा गेल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली होती. या पार्श्‍वभूमीवर आपल्या भागात पुन्हा अशी वेळ उद्भवू नये तसेच पावसाच्या अनियमततेला मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याने किमान आपल्या परिसरात पावसाचा समतोल राखला जावा, यासाठी स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'आधुनिक मेघ मल्हार' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत, त्यासंबंधी आवश्यक उपाय राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्याची सुरुवात १७ जुलै रोजी करण्यात आली. सद्यस्थितीत काही प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी अद्याप राज्यातील अनेक भाग कोरड्या दुष्काळाच्या छायेत आहेत. पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने पाण्याचे भीषण संकट उभे राहीले असून, शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. हे संकट एका दिवसात उभे राहिले नसून, याकरिता कारणीभूत अनेक घटकांना निसर्गामध्ये होत असलेला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे. पूर्वीच्या काळी पावसाने उघडीप दिल्यास पाऊस पडावा यासाठी राग मेघमल्हार गायिला जायचा. या पार्श्‍वभूमीवर आजच्या या आधुनिक युगात पावसाचा समतोल राखायचा असल्यास ह्यआधुनिक मेघमल्हारह्ण ही अभिनव संकल्पना अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भागामध्ये पावसाचा समतोल राखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्यावतीने पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत व त्यांच्यावर जे उपाय केले पाहिजेत, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाच्या सर्व विभागामध्ये, मुला-मुलींचे वसतिगृह, कार्यालयांमध्ये इंधन बचत मोहीम हाती घेण्यात आली आहे तसेच ह्यरेन वॉटर हॉर्वेस्टींगह्ण, महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षरोपण, महाविद्यालय परिसरातील काडी कचरा, कागद आदी जाळून न टाकता त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करून झाडांसाठी वापरणे, महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने घरगुती कामासाठी सायकलचा वापर करणे, परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून इंधन व पाणी बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.