शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रुळावर; आघाडीला देणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 6:14 PM

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे. बुलडाणा विधानसभेत गतवेळी दुसºया क्रमांकाची मते मनसेच्या उमेदवाराने घेतली होती. त्यामुळे मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रूळावर ही बाब पाहता आघाडीला याचा फायदा होऊ शकतो, असा कयास आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँगे्रस व काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडत आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मनसेच्या पदाधिकाºयांनी मागील आठवड्यामध्ये मनसे आघाडी सोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सोबत आल्याने शिवसेनेसाठी थोड्याबहुता प्रमाणात चिंतेची बाब ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या सहा महिन्यापूर्वी विदर्भाकडे विशेष लक्ष देवून अनेक ठिकाणचा आढावा घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ ते २६ आॅक्टोबर २०१८  या दरम्यान विदर्भ दौºयावर असताना त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलडाणा, मेहकर, लोणार, सिंदेखड राजा या मतदार संघात पदाधिकाºयांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच लोणार येथे मुक्काम करून पदाधिकाºयांसमोर  केंद्र सरकारविरोधात आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे यांच्या या दौºयानंतर जिल्ह्यातील थंडावलेल्या मनसेच्या पदाधिकाºयांमध्ये उर्जितावस्था निर्माण झाली होती. मनसेचे काही पदाधिकारी आपली मरगळ झटकुन कामालाही लागले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या या मैदानात मनसेने आपले इंजिन न उतरवता भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात प्रचाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मनसेच्या  फॉलोअर्सची मते आघाडीच्या उमेदवाराकडे वळणार असल्याचे चित्र तुर्तास तरी दिसते.

बुलडाणा विधानसभेत होती दुसºया क्रमांकाची मतेबुलडाणा जिल्ह्यामध्ये मनसेला फारसा जनाधार नसला तरी बुलडाणा विधानसभेत गतवेळी दुसºया क्रमांकाची मते मनसेने घेतली होती. तर मनसेचे फॉलोअर्स जिल्ह्यात आहेत. त्याचाही फायदा होऊ शकतो.  युवा वर्गाला राज ठाकरे यांचे आकर्षण आहे. त्यामुळे हा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे काही प्रमाणात झुकू शकतो. मात्र ही बाब शिवसेना उमेदवारासाठी चिंतेची आहे. मनसेला जिल्ह्यातील इतर निवडणुकांमध्ये पाहिजे तसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. जिल्ह्यातील नगर पालिका, जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकात मनसे उतरत नसली तरी इतर पक्षाला साथ देऊन बळ देण्याचे काम मात्र निश्चितच होते. 

‘जोश आणि होश’‘जोश आणि होश’ या दोन्ही पातळीवर मनसेसाठी बुलडाणा जिल्ह्यात भरीव काही करण्यासारखे अद्यापही बाकी आहे. ‘जोश’ असलेले अनेक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या मागे आहेत. सहा महिन्यापूर्वी जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या दौºयाने युवकांचा जोश दाखवूनही दिला आहे. 

बुलडाण्याच्या दौºयानंतर झाला होता शरद पवारांसोबत एकत्रीत प्रवासमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा महिन्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास केला. हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसून चर्चा करीत असल्याचे दिसत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर बरेच गुºहाळ चालले. बुलडाणा जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील परिस्थिती सुद्धा शरद पवार यांच्यासमोर मांडली असू शकते. या प्रवासातून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक स्पष्ट झाली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019