शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला प्रकरणात आरोपींची नावे चुकल्याने पोलीस चक्रावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 11:09 IST

Khamgaon Crime News : चार आरोपींच्या नाव साधर्म्यामुळे बुधवारी पोलीस चांगले चक्रावले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक आठवडी बाजारातील इंगळे प्राणघातक हल्ला प्रकरणात चार आरोपींच्या नावावरून पोलिसांसह संबंधितांची चांगलीच तारांबळ उडाली. एकाच गुन्ह्यातील चार आरोपींच्या नाव साधर्म्यामुळे बुधवारी पोलीस चांगले चक्रावले.आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र, गुलाब, निलेश आणि अभय इंगळे यांच्यावरील प्राण घातक हल्ला प्रकरणी नगर पालिका कर्मचारी आणि गुन्ह्यातील आरोपी मोहन अहीरसह सर्वच आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, सतीफैलातील मोहन अहीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा शिवाजी वेस भागातील मोहन देवीनारायण अहीर यांनी बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. ‘ते आम्ही नव्हेच!’ असे म्हणत आमचा गुन्हा काय? आमच्या बदनामीला जबाबदार कोण? अशा प्रश्नांचा भडीमार केला. काहीवेळ रोष व्यक्त केला. मोहन देवीनारायण अहीर यांच्यासोबतच मोहन अहीर यांच्यासह रतन अहीर, आशीष अहीर आणि मनोज अहीर असे नामसाधर्म्य असलेले चौघे पोलीस स्टेशनमध्ये धडकले. नामसाधर्म्यामुळे खामगाव शहर पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले. वरिष्ठांकडूनही याप्रकरणी विचारणा होऊ लागल्याने शहर पोलिसांना बुधवारी चांगलेच चक्रावल्याचे दिसून आले.

अहीर कुटुंबातील चौघांना मनस्ताप!हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या अहीर कुटुंबातील आणि शिवाजी वेस भागातील अहीर कुटुंबातील चौघांच्या नावामध्ये नामसाधर्म्य आहे. त्यामुळे शिवाजी नगर भागातील मोहन देवीनारायण अहीर, रतन देवीनारायण अहीर या बंधूसह मनोज अहीर आणि आशीष जगदीश अहीर या चौघांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

आरोपी असलेले अहीर कुटुंबिय फरार!  आठवडी बाजारातील इंगळे कुटुंबियांवर हल्ला प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले मोहन अहीर आणि त्यांचे कुटुंबिय शहरातील सती फैल भागात राहते.   गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यांच्यासह गुन्ह्यातील सर्वच २३ आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

गुन्ह्याची तक्रार नोंदविताना वडिलांचे नाव चुकल्याने माझ्यासह भावाला आणि नाम साधर्म्यामुळे दोन मुलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही काहीही केलेले नसताना समाजात बदनामी झाली. चुकीची दुरूस्ती करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलंय.-मोहन देवीनारायण अहीरशिवाजी वेस, खामगाव.

फिर्यांदीकडून नावे सांगताना वडीलांचे नाव सांगताना गफलत झाली. याप्रकरणी दुरूस्ती केल्या जात आहे. शिवाजी वेस भागातील अहीर कुटुंबियांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी