शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजमाफियांचे धाबे दणाणले

By admin | Updated: June 28, 2014 01:43 IST

मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यात महसुल विभागाची कारवाई.

मेहकर : महसूल विभागाच्यावतीने गौण खनिज तस्करांवर गत दोन महिन्यामध्ये ३६ वाहनधारकांवर कारवाई करुन २ लाख १ हजार ६00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. महसूल विभागाने गौण खनिज तस्करांविरुद्ध कारवाईचा सपाटासुरू केल्याने अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत.
मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातून एकमेव पैनगंगा आणि खडकपुर्णा नदी वाहते. या नदीमध्ये पाच ते २५ फुट खोल रेतीसाठा आहे. परंतू, महसुल खात्याच्या काही अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे अवैध गौण खनिज उत्खननाला तालुक्यात पेव फुटले आहे. महसूल विभाग गौण खनिज तस्करांवर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह सहकार्‍यांनी गौण खनिज माफीयांवर पाळत ठेऊन गत दोन महिन्यात ३६ वाहन धारकावर कारवाई केली आहे. महसुल विभागाच्यावतीने ९ मे ते २५ जून दरम्यान अवैध रेती वाहतूक करणार्‍या १७ वाहनांवर कारवाई करुन १ लाख १0 हजार ४00 रुपये दंड वसुल केला आहे.
तसेच अवैध माती वाहतूक करणार्‍यांकडून २७ हजार ५00, अवैध मुरुम वाहतूक करणार्‍यांकडून ५७ हजार ३00, अवैध गिट्टी वाहतूक करणार्‍यांकडून ३ हजार २00 व डब्बर वाहतूक करणार्‍यांकडून ३ हजार २00 रुपये दंड वसुल केला आहे. अशाप्रकारे दोन महिन्यात अवैध गौण खनिज माफीयांकडून २ लाख १ हजार ६00 रुपये गोळा करण्यात आले आहेत. ९ मे ते २५ जून दरम्यान मेहकर, फैजलापूर, हिवराआश्रम, जानेफळ, पांगरखेड, अंजनी बु., उकळी, सोनाटी या परिसरात मोठय़ा प्रमाणात गौण खनिज माफीयांवर कारवाई करण्यात आली.

*नियमाला मूठमाती
दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरीक्त नदीपात्रात दोन मिटर पेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतांनाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मुठमाती दिल्या जात आहे. रेतीची वाहतूक करतांना वाळू झाकून नेणे बंधनकारक असतांना कोणीही हे नियम पाळत नाहीत. तसेच नियमबाह्य अधिक प्रमाणात रात्रीच्या वेळीच रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे.