शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाने केला चिमुकलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:41 IST

एका अल्पवयीन मुलाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात डिसेंबर रोजी ेएका अल्पवयीन मुलाने चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.खामगाव शहरात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलगी सात डिसेंबरला दुपारी एकटीच जात होती. तिला एकटे पाहून परिरातील एका अल्पवयीन मुलाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला. सोबतच तिचा विनयभंग केला.घडलेला हा प्रकार चिमुकलीने घरी तिच्या आईस कथन केला. त्यानंतर पीडित मुलीच्याकुटुंबियांनी प्रकरणाची शहानिशा करत खामगाव शहर पोलिस ठाणे गाठत अल्पवयीन आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन मुला विरोधात चिमुकलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तथा पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत. अपघातात एकाचा मृत्यूखामगाव : बुलडाणा रोडवरील गोंधनापूर जवळ सात डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मात्र या संदर्भात खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मृतकाचे नावही स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :khamgaonखामगावMolestationविनयभंग