शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे उपबाजार बंदच !

By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्नीत उपबाजार बंद स्थितीत आहेत.

खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्नीत बोरीअडगाव व पिंपळगाव राजा येथील उपबाजार बंद स्थितीत आहेत. या भागातील शेतकर्‍यांसाठी सुविधा म्हणून चालू करण्यात आलेल्या या उपबाजारातील लाखो रुपयांच्या इमारती धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे बंद असलेल्या या उपबाजाराला पुर्ववत सुरु करण्यासाठी नवसंजिवनीची गरज आहे.शेतकर्‍यांच्या माल विक्रीसाठी तसेच जनावरे विक्रीकरिता खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव सज्ज आहे. मात्र तालुक्यातील शेवटच्या टोकावरुन तसेच इतर तालुक्यातील शेतकर्‍यांना खामगावला येणे जाणे दुरचे होते. याचा विचार करुन शेतकर्‍यांना त्यांचा माल विक्रीसाठी परिसरातच धान्य बाजार व कापसाची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने शासकीय स्तरावरुन प्रयत्न करण्यात आले. बोरीअडगाव व पिंपळगाव राजा या ठिकाणी उपबाजाराची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी धान्य बाजार सुरुवातही झाली.खामगाव तालुका हा कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यांना खामगावला कापूस विक्रीसाठी जाणे दूर पडत होते.त्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने १५ फेब्रुवारी १९८४ रोजी बोरीअडगाव येथे जिनिंग फॅक्टरीचे उद्घाटन झाले. जिनिंग सुरुझाली. बोरीअडगाव येथे रुईच्या गाठी बनत होत्या. तसेच २00 ते २५0 मजुरांना कापूस संकलन केंद्रावर रोजगारही मिळत होता. बोरीअडगाव येथे शेतकर्‍यांना जाणे येणे सोयीचे म्हणून या भागातील ३0 ते ३५ खेड्याची नाळ बोरीअडगावशी जोडलेली आहे. शेतकर्‍यांची वाढती संख्या पाहता येथे राज्य शासनाच्या वतीने बचत भवन, शेतकरी निवासाची व्यवस्था करण्यात आली. लाखो रुपयाच्या इमारती बांधण्यात आल्या. कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी असे पर्यंत येथे रेलचेल होती. मात्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद होताच उपबाजारावर अवकळा आली. धान्य बाजारालाही व्यापार्‍यांचा फारसा प्रतिसाद नसल्याने तो बंद पडला व सद्यास्थितीत केवळ इमारतीच उभ्या आहेत. परिणामी उपबाजारासाठी असलेली जागा व इमारती सध्या धुळखात पडल्या आहेत. बोरीअडगाव व पिंपळगाव राजा येथील उपबाजार पूर्ववत सुरु करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. मात्र व्यापार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून आला नाही. तर शेतकर्‍यांचा ओढाही खामगाव येथील कृउबासकडे वाढल्याने हे दोन्ही उपबाजार मागे पडले असल्याचे कृउबासचे मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख यांनी सांगीतले. * जिनींग फॅक्टरीला अखेरची घरघर!बोरीअडगाव येथे कापूस संकलन केंद्रावर शेतकर्‍यांची गर्दी नेहमीच झाली होती. कापूस खरेदीच्या ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत तसेच नंतर रुईच्या गाठी बनेपर्यंत जिनिंग फॅक्टरी उकाळून निघत होती. मजुरवर्गालाही रोजगार मिळत होता. मात्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद झाल्यानंतर शेतकर्‍यांचा कापूस खाजगी व्यापार्‍याकडे जावू लागला व येथेच जिनिंग फॅक्टरीला अखेरची घरघर लागली. आज जिनींग फॅक्टरी भंगारात पडलेली आहे.