विवाहितेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:39 IST2020-12-07T12:36:36+5:302020-12-07T12:39:30+5:30

Buldhana Crime News, Molestation वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून विनयभंग केला. 

Marital infidelity, a crime against one | विवाहितेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा

विवाहितेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा

ठळक मुद्देआरोपी टिलू जाधव (३५) हा महिलेच्या घरी आला. घरी कोण कोण आहे, अशी विचारणा पीडितेस केली.

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा शहरातील आनंदनगर भागातील ३६ वर्षांची पीडित महिला ही घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी टिलू जाधव (३५) हा महिलेच्या घरी आला व त्याने घरी कोण कोण आहे, अशी विचारणा पीडितेस केली. सोबतच वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून विनयभंग केला. 
पीडित महिलेने आरडाओरड केल्याने घरातील इतर सदस्य धावत आले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी रात्री उशिरा बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी टिलू जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. डीबी पथकातील दत्तात्रय नागरे व संजय कायंदे यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

Web Title: Marital infidelity, a crime against one