विवाहितेचा मृत्यू; हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप

By Admin | Updated: July 14, 2017 00:49 IST2017-07-14T00:49:27+5:302017-07-14T00:49:27+5:30

बुलडाणा : शहरातील अष्टविनायकनगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला असून, वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

Marital death; The father charged with murder | विवाहितेचा मृत्यू; हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप

विवाहितेचा मृत्यू; हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप

बुलडाणा : शहरातील अष्टविनायकनगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला असून, वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. ज्योती श्रीधर टाकळकर या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, तिचे वडील किरण वामनराव पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
अष्टविनायकनगरातील ज्योती श्रीधर टाकळकर (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर ज्योती यांचे वडील किरण वामनराव पाटील यांनी तक्रार दिली की, त्यांच्या मुलीला घरून १ लाख रूपये आणण्याची मागणी करीत मानसिक त्रास दिल्या जात होता. वारंवार तिला पैसे आणण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच तिला मानसिक त्रास दिला जात होता. या तक्रारीवरून पोलिसांनी पती श्रीधर टाकळकर याच्याविरूद्ध कलम ४९८, ३०५ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या वडिलांनी केली आहे.

Web Title: Marital death; The father charged with murder