आणेवारी ३४ वरुन ५६ पैशांवर

By Admin | Updated: October 2, 2015 02:18 IST2015-10-02T02:18:23+5:302015-10-02T02:18:23+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील आणेवारी १५ दिवसातच बदलली.

From March 34 to 56 paise | आणेवारी ३४ वरुन ५६ पैशांवर

आणेवारी ३४ वरुन ५६ पैशांवर

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर या तीनही तालुक्यातील पीकपरिस्थिती गंभीर आहे. नदी, नाले, तलाव आदी जलस्त्रोत कोरडे पडल्याने व जनावरांच्या चार्‍याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाल्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी १५ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्याची आणेवारी ३४ पैसे काढली. त्यानंतर १५ दिवसाने बुलडाणा जिल्ह्याची आणेवारी ५0 पैशाच्यावर काढण्याचा फतवा निघताच सिंदखेडराजा तालुक्याची नजर आणेवारी ३४ पैशावरुन ५६ पैशावर गेली. मृग नक्षत्रात सुरुवातीला समाधानकारक पावसावर अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली होती. दरम्यान, दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणचे खरीप पीक करपले. पावसाच्या या हुलकावणीमुळे तालुक्यातील नदी, नाले, तलाव, विहीर आदी जलस्त्रोत कोरडेठण्ण पडले. दरवर्षी नजर आणेवारी नोव्हेंबरमध्ये काढण्याची परंपरा होती; परंतु यावर्षी दुष्काळाची दाहकता अधिक असल्याने १५ सप्टेंबर रोजी तालुक्याची आणेवारी काढण्यात आली. त्यामध्ये तालुक्याची ३४ पैसे आणेवारी निघाली. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तालुक्यात थोड्याबहुत प्रमाणात जलस्त्रोतांची स्थिती सुधारली; मात्र पिके हातची गेलेली होती. त्यानंतर १५ दिवसाने बुलडाणा जिल्ह्याची आणेवारी ५0 पैशाच्यावर काढण्याचा फतवा वरिष्ठ स्तरावरुन निघताच सिंदखेडराजा तालुक्याची नजर आणेवारी ३४ पैशावरुन ५६ पैशावर गेली आहेत.

Web Title: From March 34 to 56 paise