मलकापूर : अवैध गर्भपात प्रकरणात जामीन फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:12 AM2018-02-08T01:12:07+5:302018-02-08T01:13:36+5:30

मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. 

Malkapur: In an illegal abortion case, bail is rejected! | मलकापूर : अवैध गर्भपात प्रकरणात जामीन फेटाळला!

मलकापूर : अवैध गर्भपात प्रकरणात जामीन फेटाळला!

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपीमध्ये डॉक्टरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. 
त्यावरून पो.स्टे. बोराखेडी यांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपी डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक केलेली होती. सदर आरोपी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळण्यास अर्ज केलेला होता. सदर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे.
डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण यांनी एका महिलेचा अवैध गर्भपात करीत असताना सदर महिलेच्या पोटात अर्भक राहिल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यावेळी सदर महिलेस अकोला येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर हॉस्पिटल प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सदर अवैध गर्भपाताबाबत माहिती कळविली होती. त्यावरून जिल्हा शिल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर व डॉ.ब्रिजलाल सुपडा चव्हाण व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून पो.स्टे. बोराखेडी येथे विविध कायद्यांच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणातील आरोपी डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर यांच्या अटकेनंतर तपास कामी पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन मिळण्याकरिता केलेला अर्ज वि. न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी कोर्ट मोताळा यांनी फेटाळला होता. त्यानंतर आरोपी डॉ. आबिद हुसेन सैयद नाजीर यांनी जामीन मिळण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर येथे अर्ज केलेला होता. सदरच्या जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांच्या न्यायालयात ६ फेब्रुवारी २0१८ रोजी पूर्ण झाली. सदरच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे विवेक मा. बापट सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून वि. न्यायालयाने आरोपी डॉ. आबिद हुसेन सैयद नाजीर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  गुन्ह्याचा तपास बोराखेडी पोलीस स्टेशन ऑफिसर भामरे हे करीत आहेत.  गुन्ह्यातील अन्य आरोपी सूरत येथील डॉक्टर तसेच सदर डॉक्टरचा स्थानिक सूत्रधार एजंट फरार असून, त्याच्या अटकेकरिता तपास पथक करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील अन्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, आणखी काही मंडळी यामध्ये पकडण्याची शक्यता आहे.

Web Title: Malkapur: In an illegal abortion case, bail is rejected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.