शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांची लोणार पोलीस स्टेशनवर धडक

By admin | Updated: May 24, 2017 00:17 IST

दारूबंदी न केल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : दारूबंदीनंतरही शहरासह तालुक्यातील अनेक ढाब्यांवर सर्रास दारू विक्री सुरू असून वरली, मटका व गुटखा विक्री सुरू आहे, त्यामुळे युवक व्यसनाधीन होत आहे. तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, या मागणीसाठी २३ मे रोजी महिला लोणार पोलीस स्टेशनवर धडकल्या. त्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी तहसील कार्यालय व लोणार पोलीस स्टेशन येथे विनायक मापारी व आखाडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.गुटखाबंदी राज्यात केली असली, तरी लोणार तालुक्यात मात्र सहज गुटखा उपलब्ध होतो. वरली, मटका चोरी चुपके हॉटेल, खानावळीमध्ये खेळला जातो, तर आता दारूबंदी झाली असली, तरी शहरासह तालुक्यातील अनेक ढाबे, हॉटेल व खानावळीवर अव्वाच्या सव्वा किमतीत दारू उपलब्ध होत आहे. दारूबंदीच्या नावाखाली तिप्पट किमतीने दारू विकल्या जात आहे. खुलेआम गुटखा मिळत असल्यामुळे गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, तसेच चोरून दारू पिणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली दिसून येत आहे. यामुळे युवक व्यसनाधीन होत असून, कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. त्यामुळे तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी येथील महिलांनी पोलीस स्टेशन गाठले, तसेच सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन विनायक मापारी व अंबादास आखाडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. दारूबंदी न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.