शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लोणारचा ‘ग्रीन हाऊस प्रकल्प’ ठरणार दिशादर्शक

By admin | Updated: February 5, 2015 01:28 IST

अतिक्रमकांसाठी प्रदुषणमुक्त घरकुलांची निर्मिती: केंद्र, राज्य आणि नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम.

मयुर गोलेच्छा/ लोणार:जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवर काठावरील अतिक्रमणधारकांना स्थलांतरीत करण्यासाठी लोणार नगरपालिकेने शहराबाहेर सुरु केलेला ग्रीन हाऊस प्रकल्प हा देशातील पहिलाच प्रयोग असून, भविष्यात तो दिशादर्शक ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत भोगवटदारांना प्रदुषणमुक्त घरे मिळणार आहे.सरोवर काठावरील ६0६ कुटूंबांना अतिक्रमीत जागेवरुन स्थलांतरीत करण्यासाठी २0१0 साली नगरपरिषद आणि अकोल्याच्या तांत्रिक सल्लागाराने ग्रीन हाऊसींग प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास सन २0१२ मध्ये केंद्र शासनाने मान्यता दिली. ग्रीन हाऊसींग प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करताना लोणार शहराचे पौराणिक, वैज्ञानिक, भौगोलीक, तसेच ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून बांधकामादरम्यान पर्यावरणावर परिणाम न होता प्रदुषणमुक्त घरांचा आराखडा तयार करण्यात आला. राज्यातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटन स्थळ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार येथे एकात्मीक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत ६0६ घरकुलांचा ग्रीन हाऊसिंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. ग्रीन हाऊसिंग प्रकल्पास या महिन्यात सुरुवात झाली असून, ऑगस्ट २0१५ पर्यंत तो पुर्णत्वास जाणार आहे. २0 कोटीच्या या प्रकल्पास ७0 टक्के निधी केंद्र सरकार, २0 टक्के निधी राज्य सरकार आणि १0 टक्के निधी स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ६0६ घरांच्या या प्रकल्पास हुडको नवी दिल्लीकडून उत्कृष्ट ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला आहे. येथे उभारण्यात येणार्‍या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पामुळे लोणारचे नाव संपूर्ण देशात लोणार मॉडेल म्हणून गाजणार आहे. नगरअघ्यक्षा रंजना मापारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रीन हाऊस प्रकल्पाअंतर्गत अतिक्रमीत लाभार्थ्यांना १0 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. १ लाख ७५ हजार रुपये एका घराची किंमत राहणार असून, स्वस्त दरात उच्च दर्जाचे प्रदुषणमुक्त घर अतिक्रमीत भोगवटदारांना उपलब्ध होणार असून पर्यावरणपूरक घरांची निर्मिती हे या ग्रीन हाऊस प्रकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.