शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

आरंभ नव्या पर्वाचा..नव्या अपेक्षांचा !

By admin | Updated: October 26, 2014 23:37 IST

निवडणुकी पश्‍चात बुलडाणा जिल्ह्यातील सातही नवनिर्वाचित आमदारावर अपेक्षांचे ओझे.

राजेश शेगोकार /बुलडाणाविधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. बुलडाणा जिल्ह्यातून तीन आमदार नव्यानेच विधानसभेत दाखल होत असून, या प्रत्येकाने इतिहास घडविला आहे. चार आमदार पुन्हा सभागृहाची पायरी चढणार असले तरी ही पायरी चढण्यासाठी त्यांची झालेली ओढाताण ही भविष्यात गेल्या टमपेक्षाही जास्त काम करावे लागणार असल्याचे संकेत देणारी आहे. त्यामुळे बुलडाण्यातील सातही मतदारसंघांमध्ये हाती आलेले निकाल हे नव्या पर्वाचा आरंभ करणारे जसे आहेत तसेच त्यांच्यावर नव्या अपेक्षांचे ओझे ठेवणारेही आहेत.बुलडाणा मतदारसंघात सर्वार्थाने नव्या पर्वाचा प्रारंभ आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सपकाळांनी नेत्यांच्या नव्हे, तर लोकांच्या भरवशावर निवडणूक लढली व लोकांनीच त्यांना विजयी केले. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर लोकांच्या अपेक्षांचे ओझे हे सर्वाधिक राहणार आहे. बुलडाण्याच्या खालोखाल किंबहुना सत्तापक्षाचे असल्यामुळे त्याहीपेक्षा जास्त अ पेक्षांचे ओझे हे खामगावचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्यावर आले आहे. जातीच्या नव्हे, तर विकासकामांच्या भरवशावर दिलीपकुमार सानंदा यांनी निर्माण केलेल्या साम्राज्या पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन त्यांना काम करावे लागेल.सिंदखेडराजा मतदारसंघात सतत दहा वर्षांपासून लोकांच्या सुखदु:खात धावून जाणारा कार्यकर्ता आता आमदार झाला आहे. डॉ. शशिकांत खेडेकर व उषा खेडेकर हे दाम्पत्य या मतदारसंघात सर्वांना परिचित आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रभावात असलेला हा मतदारसंघ भगव्या झंझावातात नेताना त्यांचाही कस लागणार आहे. सतत दोन दशके सत्तेत राहूनही या मतदारसंघाची दशा अन् दिशा हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय आहे त्यामुळे डॉ. खेडेकरांसमोरचे आव्हान मोठे आहे. जातीपातीच्या राजकारणात अडकलेला हा मतदारसंघ यापुढे विकासाच्या मुद्यावर मतदान करेल, हे सिद्ध करण्याची मोठी संधी डॉ.खेडेकर यांच्या पुढे आहे. या तीन आमदारांव्यतिरिक्त उरलेले चार आमदार हे सभागृहात अनुभवी आहे. चैनसुख संचेती यांना मंत्रिपदाची मोठी संधी आहे. सतत पाचव्यांदा निवडून येताना त्यांची मोठी दमछाक झाली. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांची मेहनत सफल झाली. पक्ष व म तदारसंघ सांभाळताना त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवत युवा नेत्यांनाही संधी दिली. त्यामुळे आता येणार्‍या काळात खारपाणपट्टामुक्त जळगाव जामोद हा त्यांचा अजेंडा असला पाहिजे. चिखलीचे आमदार राहुल बोेंद्रे यावेळी प्रचंड जातीय समीकरणात अडकले होते. कधी गटांमुळे, तर कधी जातींमुळे नेत्यांचा बळी घेणारा हा मतदारसंघ यावेळी मात्र विकासाच्या सोबतीला राहिला. बोंद्रे यांच्याविषयी उभी करण्यात आलेली नाराजी ही त्यांच्या वागण्या- बोलण्यात किंबुहना देहबोलीमुळे सर्वाधिक होती. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर हे सर्वार्थाने भाग्यवान आहेत. मात्र, केवळ नशिबावर नव्हे, तर नशिबाला परिङ्म्रमाचीही जोड देण्याचे त्यांचे कौशल्य असल्याने ते पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी झालेत. यदाकदाचित शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झालीच, तर मंत्री म्हणूनदेखील त्यांची वर्णी लागू शकते.