शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांची तारांबळ

By admin | Updated: January 19, 2015 02:47 IST

लोणार तालुक्यातील प्रकार; तलाठय़ांकडून दुष्काळग्रस्त शेतक-यांची यादी लावण्यास टाळाटाळ.

लोणार : अपुर्‍या पावसामुळे लांबलेली पेरणी, यामुळे घटलेले पिकांचे उत्पादन, यानंतर परतीच्या पावसाने दिलेला फटका अशा तिहेरी नैसर्गिक संकटांमुळे दुष्काळात होरपळणार्‍या तालुक्यातील ३६ हजार ३४ अत्यल्प भूधारक आणि ७ हजार ११३ बहुभूधारक शेतकर्‍यांसाठी शासनाकडून ९ कोटी रुपये १0 जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत. मदतीस पात्र खातेदारांची बिनचूक यादी तयार करून ती ग्रामपंचायत कार्यालयात प्रकाशित करण्याचे निर्देश तलाठय़ांना असतानासुद्धा अद्याप तालुक्यातील काही गावांच्या याद्याच प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. तलाठय़ांकडून याद्या लावण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली आहे.तालुक्यातील ३६ हजार ३४ अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना ४ हजार ५00 रुपये प्रतिहेक्टर मदत मिळणार असून, यासाठी दोन हेक्टरपर्यंतची र्मयादा राहणार आहे. ७ हजार ११३ बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंत मदत दिली जाणार आहे. सदर मदत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने तलाठय़ांना अशा खातेदारांच्या बिनचूक याद्या तयार करून, त्यांचे चावडी वाचन करून त्या ग्रामपंचायतच्या फलकावर दर्शनी भागात लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून आल्यानंतरही या याद्या अद्याप ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या नाही. यामुळे यादीत आपले नाव, खातेक्रमांक बरोबर आहे की नाही, याची खातरजमा स्थानिक तहसील कार्यालयात करण्यासाठी शेतकर्‍यांची ग्रामीण भागातून पळापळ होत आहे. याद्या लावण्यासाठी पटवार्‍यांकडून टाळाटाळ होत असल्यामुळे मदतीपासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याकडे तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष देऊन याद्या प्रसिद्ध करण्यासाठी तलाठय़ांना निर्देश देण्यात यावे. अल्प भूधारक, बहुभूधारक दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपात मिळणारी रक्कम खात्यात जमा होणार आहे. सदर रक्कम नापिकीमुळे थकलेल्या कर्जात वळती करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रा. बळीराम मापारी यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जाहीर झालेल्या मदत निधीपैकी पहिल्या टप्प्यात केवळ ४0 टक्के निधी म्हणजे नऊ कोटी रुपये तालुक्याला प्राप्त झाले आहेत. गावाच्या क्रमवारीनुसार सदर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ होणार नाही तसेच उर्वरित निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार नीलेश अपार यांनी सांगीतले.