शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खामगावला अतिक्रमणाचा विळखा!

By admin | Updated: May 12, 2014 22:34 IST

नगर परिषदेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाला कुंभकर्णी झोप

खामगाव: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह शहरातील रस्त्यांचा श्‍वास मोकळा करण्यासाठी अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाला बहुताशं तालुक्यासह खामगाव शहरातही केराची टोपली दाखविल्या जात असल्याचे चित्र आहे. नगर परिषदेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाला कुंभकर्णी झोप लागल्यामुळे मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसोबतच संपूर्ण शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरूंद झाले आहेत. अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघाताचे प्रमाणही वाढते. त्याचप्रमाणे भांडणांचीही शक्यता वाढीस लागते. अतिक्रमणामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तेरा तालुक्यातील प्रमुख शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. अतिक्रमण स्वत:हून न काढल्यास संपूर्ण जिल्ह्यात विशेष अतिक्रमण मोहिम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. अतिक्रमण निमुर्लन मोहिम राबविताना कुणीही कुचराई न करण्याचेही निर्देश जिल्हाधिकार्‍यांचे आहेत. मात्र, नगर पालिका प्रशासनाची अतिक्रमणाबाबत मवाळ भूमिका असल्याने अतिक्रमण धारकांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्त्यासोबतच खामगाव-नांदुरा रस्ता, महसूल प्रशासनाच्या जागेवर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण आहे. या अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्याच्याही सूचना आहेत. शहरातील भुसावल चौक, टॉवर, नांदुरा रोड, टिळक पुतळा, कारंजा चौक, अकोला बाजार आणि मुख्य शासकीय कार्यालयासमोर अतिक्रमण आहे.