शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी किन्होळा सरसावले

By admin | Updated: December 10, 2014 00:44 IST

ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट.

चिखली (बुलडाणा) : वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या विशेष कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पैनगंगेच्या काठावर असतानाही तालुक्यातील किन्होळा गावाला नेहमीच तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ, तर कधी महापुराच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावचे तरुण सरपंच दीपक बाहेकर यांनी पुढाकार घेऊन ह्यजलयुक्त शिवारह्ण ही लोकचळवळ राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावा यासाठी प्रयत्नरत आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरातीसाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.वारंवार येणारा दुष्काळ राज्याची प्रमुख समस्य आहे.यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी ह्यजलयुक्त शिवारह्ण या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत व्यापकपणे लोकसहभागाच्या माध्यमातून राज्यात नवी चळवळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्री ना. फडणवीस यांचा असून, याबाबत अधिकृत घोषणा करताच ही योजना राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावी, यासाठी तालुक्यातील किन्होळा येथील तरुण सरपंच दीपक बाहेकर सरसावले आहेत. सरपंच बाहेकर यांनी या योजनेचे महत्त्व जाणून घेत गावात ही योजना राबविण्यासाठी तातडीने प्राथमिक स्वरूपातील प्रस्तावदेखील तयार केला आहे. किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, कोलारी या परिसरातून पैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगेचा सुमारे चार किलोमीटरचा भाग या परिसरात असून, नदीचे पात्र सुमारे ३0 मीटर रुंद आहे. सन २00२, २00४, २00६ आणि २0१३ मध्ये जिल्हय़ात अतवृष्टी होऊन पैनगंगेला आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठावरील पिके वाहून गेली. या समस्येवर आजवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांना कायम अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. तर दर उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजनेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.