शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचा-यांवर कॅम-यांचा ‘वॉच’

By admin | Updated: October 1, 2015 00:01 IST

मेहकर पंचायत समितीमध्ये लागणार सीसी कॅमेरे.

उद्धव फंगाळ /मेहकर (जि. बुलडाणा) : ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची कामे वेळेवर होऊन प्रत्येक खेडेगावाचा विकास व्हावा, या हेतूने मेहकर पंचायत समितीमध्ये लवकरच सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्याव्दारे अधिकारी,कर्मचार्‍यांवरह्यवॉचह्ण राहणार असल्याचे पं.स. सभापती सागर पाटील यांनी ३0 सप्टेंबर रोजी ह्यलोकमतह्णला माहिती दिली. पंचायत समिती ही ग्रामीण भागातील विकासात्मक कामाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मेहकर पंचायत समितीमध्ये जवळपास १४0 गावे समाविष्ट आहेत. प्रत्येक गावातील विविध कामांवर पंचायत समितीचे नियंत्रण असते. दरम्यान, ग्रामीण भागातून प्रत्येक व्यक्ती हा दररोज काही ना काही कामानिमित्त पंचायत समितीमध्ये येत असतो. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर हजर राहत नसल्याने तेथे येणार्‍या व्यक्तीचे काम ठरलेल्या वेळेवर होत नसल्याने त्याला आर्थिक भुर्दंंंंड सहन करावा लागतो. काही अधिकारी व कर्मचारी कामाच्या वेळेतदेखील कार्यालयात हजर राहत नाहीत. कोणतेही दौरे, शासकीय काम नसतानाही आपल्या कामात कुचराई करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची कामे वेळेवर व्हावी, अधिकारी कर्मचारी हे आपल्या कामाच्या वेळेत कार्यालयात हजर रहावेत, जेणेकरून जनतेची कामे ही वेळेवर होतील व ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास होईल, यासाठी एक महिन्याच्या आत मेहकर पंचायत समितीमधील शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, स्वच्छ भारत अभियान विभाग, गटविकास अधिकारी दोन्ही विभाग, सभापती विभाग, अकाउंट विभाग, मीटिंग हॉल, कृषी विभाग, रोहयो विभाग, पंचायत समिती परिसर आदी ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या सर्व कॅमेर्‍यांचे मुख्य कनेक्शन हे सभापतींच्या केबिनमध्ये राहणार आहे. त्यामुळे आता आपल्या कामात कुचराई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कॅमेर्‍यांची निगराणी राहणार असून, वेळप्रसंगी कारवाईसुद्धा होणार आहे.