जीपची दोन मोटारसायकलला धडक;  एक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:19 IST2019-07-01T13:18:43+5:302019-07-01T13:19:08+5:30

मेहकर: जीपची  दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली.

Jeep hits two motorcycles; One killed, three injured | जीपची दोन मोटारसायकलला धडक;  एक ठार, तीन जखमी

जीपची दोन मोटारसायकलला धडक;  एक ठार, तीन जखमी

मेहकर: जीपची  दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. सोमवारी सकाळी अपघातातील वाहन मेहकर पोलीसांनी ताब्यात घेतले असून जीप चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
येथील श्रीकांत अर्जून सदावर्ते (२८) व शिवा प्रल्हाद हिरगुडे हे त्यांच्या मोटारसायकल (क्रमांक एम -एच -२८-ऐ-डी- १०७०) ने पवनसुत नगराकडे डोणगाव रोडने जात होते. दरम्यान, कार्तिक चाटे (२६, रा. शिक्षक कॉलनी, मेहकर) याने जीप (क्रमांक एम-एच -२८ - ऐ-एन -३६९५) भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन सदावर्ते यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकलवरील श्रीकांत अर्जून सदावर्ते हे ठार झाले. तर शिवा प्रल्हाद हिरगुडे यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर  कार्तिक चाटे यांनी आपल्या ताब्यातील जीप भरधाव वेगात चालवून पुन्हा काही अंतरावर डोणगाव रोडवरील मँगो हाँटेल समोर अविनाश गजानन सुर्वे (रा. महादेव वेटाळ, मेहकर) व गोलू उर्फ सचिन मानघाले (रा. खंडाळा) यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर मेहकर येथे उपचार सुरु आहेत. मृतक यांच्या वडीलांच्या तक्रारीवरुन जीप चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मेहकर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. 
(प्रतिनिधी)

Web Title: Jeep hits two motorcycles; One killed, three injured