शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताह अंतर्गत ‘जलदिंडी’

By admin | Updated: March 22, 2017 01:33 IST

जलदिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचा सहभाग

बुलडाणा, दि. २१-पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने सर्व शासकीय कार्यालयामार्फत १६ ते २२ मार्चदरम्यान जागतिक जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानुसार दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नगारी उपजीविका अभियान नगर परिषद बुलडाणा व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलदिंडीचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले होते. नजमुन्निसा बेगम मोहम्मद सज्जा, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, उपाध्यक्ष विजय जायभाये, सभापती वैशाली वावरे, दीपक सोनुने, उमेश कापुरे यांचे हस्ते सदर जलदिंडीचे जलपूजन झाले. नगर परिषदच्या नगराध्यक्ष यांनी जलदिंडीला हिरवी झेंडी दाखवून जलदिंडीची सुरुवात करण्यात आली. जलदिंडीमध्ये नगर परिषदचे शाळेचे वर्ग ५ ते ७ चे सर्व विद्यार्थी, एडेड हायस्कूल व शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी सदर रॅली मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन जल जागृतीबाबत विविध घोषणा देऊन बुलडाणा शहरातील जनतेमध्ये पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जाणीव जागृती निर्माण केली. तसेच या जलदिंडीमध्ये पाण्याचे महत्त्व विशद करणारा आकर्षक चित्ररथ सुधा नगर परिषदेच्या वतीने शहरामधून फिरवण्यात आला. यामध्ये जर आपण पाण्याचा योग्य वापर व पाणी बचत केली नाही तर भविष्यामध्ये खूप मोठय़ा जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, असा महत्त्वपूर्ण संदेश राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या वतीने या चित्ररथामधून देण्यात आला. नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छताविषयक चित्ररथसुद्धा सादर करण्यात आलेला होता. सदर जलदिंडी ही सकाळी ८.३0 वा. नगर परिषद बुलडाणा शाळा क्र.२ मधून निघाली. जलदिंडीचा मार्ग हा न.प.शाळा क्र.२ ते जयस्तंभ चौक बुलडाणा शहर पोलीस स्टेशन समोरून बाजार रोड ते जनता चौक ते कारंजा चौक, कोर्ट रोड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून परत न.प. शाळा क्र.२ मधेच समारोप करण्यात आला. सर्व जलदिंडी परत आल्यानंतर सर्वांना जल प्रतिज्ञाची शपथ महेंद्र सोभागे यांनी दिली.