शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

घराघरात अन् शेतशिवारात व्हावे शिवरायांना नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

चिखली : दिवसाची सुरुवात शिवरायांना नमन करून व्हावी़, म्हणून पश्चिम महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी शेतांमध्ये आणि घराघरांत शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचे ...

चिखली : दिवसाची सुरुवात शिवरायांना नमन करून व्हावी़, म्हणून पश्चिम महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी शेतांमध्ये आणि घराघरांत शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचे लहान, मोठे पुतळे उभारले आहेत. नेहमीच स्फूर्ती मिळत राहावी म्हणून आपल्या जिल्ह्यातही शिवप्रेमींनी घराघरांत आणि शेतशिवारांमध्ये आपापल्या परीने शिवरायांचे पुतळे उभारून नैसर्गिक वातावरण शिवमय राहावे, या हेतूने चिखली केबल नेटवर्कच्या सदस्यांनी शेतात शिवरायांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसविला असून, या पुतळ्याचे अनावरण २२ फेब्रुवारी रोजी पार पडले.

येथील प्रफुल्ल देशमुख, माधव मोरपल्ले, श्रीराम नागरी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक सुनील जामदार, राजू मेहरा, राजू खरात, गजानन पठाडे, राहुल गुळवे, गोपाल तुपकर यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरच सिंहासनावर आरूढ झालेला शिवरायांचा पुतळा तुपकर यांच्या शेतात उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण २२ फेब्रुवारी रोजी माजी आ. राहुल बोंद्रे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, न. प. उपाध्यक्ष वजीराबी शेख अनिस, जिल्हा परिषद सदस्या जयश्री शेळके व डॉ. ज्योती खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी विधिवत पूजा अर्चा करून महाराजांचा पुतळा गौरव तुपकर आणि स्वराज तुपकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तद्नंतर आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवभक्त विठ्ठल राजे व त्यांच्या टीमने आरती केली. यावेळी अनिल म्हस्के, सुधीर चेके पाटील, संदीप चव्हाण, अमोल पोधाडे, डॉ. शिवशंकर खेडेकर, शेख अनिस, गणेश बरबडे, राजू परिहार, शिवराज पाटील, गजानन तारू, डॉ. मो. इसरार, जकाऊल्ला खान, रोहित खेडेकर, नाना देशमाने, साहेबराव पाटील, जावेद, शिवाजी साखरे, भोगावतीचे सरपंच जावेद, सर्व सदस्य, ग्रामसेविका सरकटे, राजू कमळसकर, गजू डुकरे, कैलास सोनुने, पिंटू वाडेकर, गजानन देव्हडे, कैलास गाडेकर, विनोद खरे, युसूफ शेख, रवी फोलाने, मंगेश पळसकर, पवन लढा, आकाश डोणगावकर, शुभम तुपकर, समीर शेख, प्रसाद देशमुख, राहुल मान्टे व नीलकमल ढोल पथक उपस्थित होते. संचालन श्याम वाकदकर यांनी केले.