शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०,२२५ कोटींच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:21 AM

Buldhana News पाच वर्षांत कालबद्ध पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनानुसार निधी उपलब्ध केल्यास सिंचन तो दूर करण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आता १० हजार २२५ कोटी ७९ लाख रुपयांवर पोहोचला असून, येत्या पाच वर्षांत कालबद्ध पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनानुसार निधी उपलब्ध केल्यास सिंचन तो दूर करण्यास मदत होईल. त्यानुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात घेतलेल्या जलसंपदा विभागाच्या वैठकीनंतर घेतलेल्या निर्णयावर सिंचन अनुशेष निर्मूलनाचे भवितव्य अवलंबून आहे.१३ हजार ८७४ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत ४ हजार ९९ कोटी (मार्च २०२० पर्यंत) खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी नऊ हजार ७७५ कोटी ५९ लाख रुपयांची गरज आहे. त्यानुषंगाने आगामी पाच वर्षांत सरासरी जिल्ह्यातील निर्माणाधीन व पूर्णत्वास गेलेल्या तथा काही किरकोळ कामे राहिलेल्या प्रकल्पांसाठी सरासरी दोन हजार रुपये उपलब्ध झाल्यास हा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त बोरखेडी, राहेरी या लघु प्रकल्पासाठी अनुक्रमे २२.७ कोटी आणि ४ कोटी ६५ लाख रुपयांची गरज आहे. या व्यतिरिक्त बळिराजा संजीवनी योजनेंतर्गत आलेवाडी प्रकल्पासाठी १२० कोटी २९ लाख, अरकचेरी प्रकल्पासाठी  २२२ कोटी ८० लाख रुपये आणि चौंढी प्रकल्पासाठी ७८ कोटी ५३ लाख रुपयांची आवश्यकता आहे. आगामी तीन वर्षांमध्ये हा निधी अपेक्षेप्रमाणे उपलब्ध झाल्यास जिल्ह्याचा १० हजार २२५ कोटी ७९ लाख रुपयांचा सिंचन अनुशेष दूर होऊ शकतो. मात्र, त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन मदत करणे गरजेचे झाले आहे. 

जिल्ह्यातील १०८ प्रकल्प पूर्ण जिल्ह्यातील दोन मोठे, सात मध्यम आणि ९९ लघु प्रकल्प पूर्णत्वास गेले असून, बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये दोन मोठ्या आणि पाच लघु प्रकल्पांचा समावेश आहे. अपेक्षित निधी नियमित स्वरूपात दरवर्षी उपलब्ध झाला तर येत्या पाच वर्षांत सिंचन अनुशेष दूर केला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

६८ हजार हेक्टर प्रत्यक्ष सिंचनजिल्ह्यातील १०८ पूर्ण झालेल्या प्रकल्पांची  निर्मित सिंचन क्षमता ही एक लाख १५६३ हेक्टर असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६९ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळत आहे. त्याचे क्षेत्र हे ६९ हजार ७०४ हेक्टर एवढे येते. दरम्यान, जिल्ह्यातील महत्तम सिंचन क्षमता ही दोन लाख २३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. निर्माणाधीन प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत आणखी वाढ होऊन जवळपास ९१ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प