शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

जागतिक विज्ञानाचा पाया भारतानेच रचला - जयंत सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 4:20 PM

‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...

अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  प्राचीन काळापासून भारतीय सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. योग, अध्यात्म, गणित आणि विज्ञानाचाही पाया भारतीयांनीच रचला आहे. जागतिक विज्ञानात भारताची मोठी देणगी आहे. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाची व प्राचीन विज्ञानाची लोकप्रियता वाढविणे हाच ‘विज्ञान भारती’चा मुख्य उद्देश आहे. देशी आंदोलन म्हणूनही ‘विज्ञान भारती’ची वेगळी ओळख आहे. ‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद...

भारतीय विज्ञानासमोरील आव्हाने कोणती?आजच्या स्थितीत जे विज्ञान आपल्याला दिसतेय ते पाश्चिमात्य विज्ञानाचे प्रतिबिंब आहे. यामुळे एक आभासी चित्र निर्माण झाले असून, आजचे विज्ञान हे संपूर्ण आयात केलेले विज्ञान आहे. यामुळे भारतीय युवकाच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की, भारतामध्ये जणू कधी विज्ञान नव्हतेच. स्वकीय विज्ञानाबद्दल भारतीयांमध्ये आस्था निर्माण करणे आणि भारतीय विज्ञानाचा अभिमान वाटावा ही भावना निर्माण करणे, हे मुख्य आव्हान भारतीय विज्ञानासमोरील आहे.

जागतिक विज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान काय?नासासारख्या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेमध्ये भारतीय वैज्ञानिकांची संख्या उल्लेखनीय आहे. डॉ. होमी भाभा, डॉ. बोस, डॉ. सी. व्ही. रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर अशी एका पाठोपाठा एक अनेक नावे जागतिक स्तरावर भारतीय वैज्ञानिकांची सांगता येतील; परंतु हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. व्यापक दृष्टीने बघायचे झाल्यास आज वैश्विक स्तरावर संगणक क्षेत्रामध्ये जी ‘बायनरी कोड’ लँग्वेज वापरली जाते. ही जागतिक विज्ञानाला भारताची मोठी देणगी आहे.

‘विज्ञान भारती’ची स्थापना कधी झाली?विज्ञान भारती ही देशातील एक अशासकीय संस्था आहे. ‘विज्ञान भारती’ची स्थापना जबलपूर येथे सन १९९१-९२ साली करण्यात आली आहे. प्रा. के. वासू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली विज्ञान भारती ही संस्था प्राचीन आणि देशी विज्ञानाची एक गतिशील चळवळ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. खामगावातदेखील विज्ञान भारती संलग्नीत नागार्जुन विज्ञान व पर्यावरण मंच डॉ. दीपक नागरिक यांच्या नेतृत्वात कार्यान्वित करण्यात आला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत