शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढतेय लसीकरणाची व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST

बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रावर कोविड लसीकरण सुरू होते. आता लसीकरणाची व्याप्ती वाढत आहे. पुन्हा नव्याने तीन केंद्रांमध्ये ...

बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत सात केंद्रावर कोविड लसीकरण सुरू होते. आता लसीकरणाची व्याप्ती वाढत आहे. पुन्हा नव्याने तीन केंद्रांमध्ये २५ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले असून, एकूण १० केंद्रांवर आता लसीकरण होत आहे. लस घेतलेले प्रत्येक जण सुरक्षित आहेत. दिवसाला नियोजन केलेल्यांपैकी ८० टक्के लोकांना सध्या लस दिल्या जात आहे.

जिल्ह्यामध्ये कोविड लसीचे लसीकरण टप्प्याटप्प्याने वाढण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे. कोविड १९ विषाणूचा नायनाट करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सहा लसीकरण केंद्रावर लसीकरणास सुरुवात झाली होती. या मोहिमेला २६ जानेवारीला १० दिवस होत आहेत. दहा दिवसांत चार केंद्र लसीकरणासाठी वाढविण्यात आले आहेत. २५ जानेवारीपासून एकूण १० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगांव, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, शेगांव व चिखली या ठिकाणी लसीकरण सुरू होते. दरम्यान, २५ जानेवारीला लोणार, नांदूरा व संग्रामपूर या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आला आहे, परंतु अद्यापही काही नोंदणीकृत लाभार्थ्यांमध्ये लस घेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतरही ते लस घेण्यासाठी येत नाहीत, परंतु असे लाभार्थी अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. अगोदर तुम्ही घ्या, नंतर आम्ही घेतो, असे म्हणणारेही केंद्रावर आल्यानंतर पाहावयास मिळतात, परंतु लसीकरणानंतर सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका केंद्रावर १०० जणांना लसीचे नियोजन

सध्या काविड लसीकरणाच्या एका केंद्रावर दिवसाला १०० जणांना लस देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ८० ते ९० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ६४६ आरोग्य संस्थामध्ये १३ हजार ९६० डॉक्टर व आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या फेरीमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आजपासून १० लसीकरण केंद्रावर कोविड लस देणे सुरू केले आहे. लस घेतलेल्यांना रिॲक्शन नाही. केंद्रावर सर्व उपचाराची सुविधा सज्ज आहे.

डॉ.बाळकृष्ण कांबळे जिल्हा आरोग्य अधिकारी