राहेरी बु :
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी व आरक्षणाचे संरक्षण करावे, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्यावतीने आमदार संजय रायमुलकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
२ हजार १८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ कराव्या, यासाठी आमदार रायमुलकर यांनी येणाऱ्या अधिवेशनात भूमिका मांडावी, असेही निवेदनात म्हटले आहे़ राज्यपाल यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून टक्केवारी वाढवून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करणे व सर्व समाज घटकांची जातिनिहाय जनगणना करावी, अशी शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री यांना विनंती करून समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार रायमुलकर यांना दिलेल्या निवेदनात संभाजी बिग्रेडच्यावतीने करण्यात आली आहे़ निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर वायाळ, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष कुलदीप गायकवाड, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष अमोल शिंगणे आदींची स्वाक्षरी आहे़