भरधाव कार उलटली; एक ठार, चार जखमी 

By अनिल गवई | Updated: May 26, 2024 11:01 IST2024-05-26T11:00:55+5:302024-05-26T11:01:52+5:30

आंबेटाकळी-बोरी आडगाव रस्त्यावरील घटना

in khamgaon speeding car overturned one dead four injured  | भरधाव कार उलटली; एक ठार, चार जखमी 

भरधाव कार उलटली; एक ठार, चार जखमी 

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना आंबेटाकळी - बोरी आडगाव रस्त्यावर रविवारी पहाटे घडली.

 प्राप्त माहितीनुसार, एम एच ३३ ए सी .२३६६ ही शेगावकडे जात होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित झालेली कार घटनास्थळी उलटली. यात   देवराव रावजी भंडारकर ५५ यांचा यांचा मृत्यू झाला. तर तर कार मधील सौ कांता देवराव भंडारकर ५०, जयदेव नामदेव नाकाडू ४०, जयश्री राऊत १६, समृद्धी कोमलवार ६ सर्व राहणार गडचिरोली असे चार जण गंभीर जखमी झाले.अ त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

Web Title: in khamgaon speeding car overturned one dead four injured 

टॅग्स :Accidentअपघात