घरगुती वादात भाच्यास समजावणे मामाच्या अंगलट; दोघांविरोधात गुन्हा दाखल

By अनिल गवई | Updated: October 19, 2023 12:29 IST2023-10-19T12:29:08+5:302023-10-19T12:29:58+5:30

याप्रकरणी तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघांिवरोधात गुन्हा दाखल केला.

In a domestic dispute, explaining to the nephew, uncle's thumb; A case has been registered against both | घरगुती वादात भाच्यास समजावणे मामाच्या अंगलट; दोघांविरोधात गुन्हा दाखल

घरगुती वादात भाच्यास समजावणे मामाच्या अंगलट; दोघांविरोधात गुन्हा दाखल

खामगाव: घरगुती वादात समजाविण्यास गेलेल्या मामाचे भाच्याने डोके फोडून बोटमोडले. खामगाव तालुक्यातील आसा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघांिवरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत देवानंद किसन गवई ४३ यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री नातेवाईक असलेल्या भाच्याला समजाविण्यास पत्नीसोबत गेले. दरम्यान, अमोल भगवान सरदार ३० आणि त्याची पत्नी  रा. आसा ता. खामगाव यांनी संगणमत करून तक्रारदार व त्यांच्या पत्नीला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी  दिली. तसेच तक्रारदारांच्या डोक्यात दगड मारून उजव्या हाताच्या बोटावर काहीतरी मारून बोट मोडल्याचे तक्रारीत म्हटले. तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी रात्री उशीरा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
 

Web Title: In a domestic dispute, explaining to the nephew, uncle's thumb; A case has been registered against both