शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

दीड हजार शाळेतील विद्यार्थ्यांना २० दिवस सोसावा लागणार उकाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:38 IST

बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे. परंतू शिक्षण विभाग सकाळच्या सत्रासाठी २० मार्चच्या निर्णयावरच ठाम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या दीड हजार शाळेतील विद्यार्थ्यांना आणखी २० दिवस उकाडा सोसावा लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तसेच दिवसेंदिवस तापमानातही वाढ होत आहे. विद्यार्थी वाढत्या तापमानामुळे त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ४४२  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपैकी जवळपास ७५ टक्के प्राथमिक शाळा ह्या टिनाच्या खोलीत भरतात. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. वर्ग खोल्या सुद्धा हवेदार नाहीत. अनेक ठिकाणी वीज व पंख्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उकाड्यात बसणे असह्य होत असल्याची ओरड शिक्षण संघटनांकडून होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने मुलांना घरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता व पाणीटंचाई या बाबींचा विचार करून सकाळच्या सत्रातील शाळा १ मार्चपासून सुरू करण्याचे पत्र शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद शिक्षण विभागकडे गेल्या आठवड्यात दिले. परंतू जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यासाठी २० मार्चचा मुहूर्त शिक्षण विभाग घेऊन बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अजून २० दिवस तरी उन्हाळ्याचा हा त्रास सोसावा लागणार असल्याचे दिसून येते.  त्यामुळे शिक्षक संघटनांसह शिक्षकवर्गही यावर नाराजी व्यक्त करत आहे. 

 परिपाठात मुलांना चक्कर येण्याची भीतीजिल्हा परिषद शाळेचा परिपाठ सकाळी ११ ते ११.३० वाजता घेण्यात येतो. परिपाठाच्यावेळी रखरखत्या उन्हात मुलांना बाहरे उभे राहावे लागते. त्यामुळे लहान मुलांना चक्कर येण्याची भीती वाटते, ग्रामीण भागातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याकडे लक्ष देण्याची गरज आदर्श शिक्षक समितीच्या (महिला आघाडी) जिल्हाध्यक्ष ममता ठाकुर यांनी व्यक्त केली. 

 खासदारांच्या पत्राला उलटले चार दिवससर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी मागणी लावून धरली आहे. तर २५ फेब्रुवारीला खासदार प्रतापराव जाधव यांनीही १ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकाºयांना द्यावे, असे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले होते. मात्र चार दिवस उलटुनही यावर कुठलाच निर्णय झाला नाही. 

 शिक्षण विभागाच्या नियमानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २० मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. अद्याप कुठल्याच शाळेत पाणीटंचाई जाणवली नाही, तसे झाल्यास ग्रामपंचायत स्तरावरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या जाते. - एस. टी. वºहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

 जिल्ह्यात पाणीटंचाई असून उन्हाची तिव्रताही वाढत आहे. अनेक शाळा टिनाच्या खोलीत भरत असल्याने मुलांना त्रास सोसावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविणे अत्यंत आवश्यक आहे. - रविंद्र अंभोरे, जिल्हाध्यक्ष, राज्य आदर्श शिक्षक समिती, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा